Abhishek Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abhishek Bachchan: ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चा, कॅमेऱ्यासमोरच अभिषेक संतापला, हात जोडत म्हणाला 'आता बस्स झालं...'

Abhishek Bachchan Viral Video: अभिषेक बच्चनचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सर्वाचेच लक्ष वेधतो आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन त्याच्या पर्सनल लाईफमुळे मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. नुकतंच एका व्हायरल व्हिडीओमुळे अभिषेक बच्चन प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या. अशातच आता अभिषेक बच्चनचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सर्वाचेच लक्ष वेधतो आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन बी टाऊनमधील लोकप्रिय कपल आहे. कायमच हे कपल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या हे कपल त्याच्या नातेसंबंधामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर रंगलेल्या या दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चा दरम्यान अभिषेक बच्चन संतापला आहे. नुकतंच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन संतापला त्याने हात जोडले आणि म्हणाला "बस्स भैया, अभी हो गया... थँक्यू! असं ऐकताच पापाराझींनी देखील त्याचे कॅमेरे खाली केले आणि अभिषेक गेला.

अभिषेक बच्चन एअरपोर्टवर स्पॉट झाला. दरम्यान पापाराझींनी अभिषेक बच्चन घेराव केला. सतत फोटो व्हिडीओ काढताना अभिषेक पापाराझींवर चिडताना दिसला तसेच हात देखील जोडले. सोशल मीडियावर अभिषेकचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी त्याला ट्रोल देखील केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avirat Patil: घे भरारी! इंजिनीअर झाला, पण पुण्याच्या FTII मध्ये गेला; जळगावच्या तरुणाच्या पहिल्याच लघुपटाला 'सुवर्ण कमळ'

म्हशीला झालं रानगव्यापासून रेडकू, दिसतंय सुद्धा रानगव्यासारखंच | VIDEO

Poha Chivada: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी घरीच बनवा चटपटीत अन् कुरकुरीत पोहा चिवडा, रेसिपी एकदा वाचाच

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; राज्यातील दुकाने राहणार 24 तास खुली, कोणती दुकाने असतील बंद

Maharashtra Politics : गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत पोसलेली कुत्री; कुणी केली जहरी टीका?

SCROLL FOR NEXT