Abhijeet Sawant New Song Instagram @abhijeetsawant73
मनोरंजन बातम्या

Abhijeet Sawant New Song : इंडियन आयडल फेम गायक अभिजीत सावंतची जादू पुन्हा चालणार; 'लफ्जों में' च्या रिमेक मन जिंकले

Lafzon Mein Song Remake:

Pooja Dange

Abhijeet Sawant Lafzon Mein Song Remake :

'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. हा शो जिंकल्यानंतर त्याचे 'लफ्जों में' हे गाणे प्रदर्शित झाले होते. अभिजीत सावंतने ते खूप सुंदर गायले आहे, आजही अनेकांना ते गाणे नवीन वाटते आणि सुखद अनुभव देते. आता हे गाणे रिक्रिएट केले जाणार आहे.

2004 साली इंडियन आयडॉल शो सुरू झाला होता. टेलिव्हिजन जगतातील हा एक भन्नाट रिअॅलिटी शो होता, ज्याच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत.

या सीझनमध्ये विजेतेपदासह अभिजीत सावंतनेही लोकांची मने जिंकली. त्याच्या गायनाने त्याला नाव आणि प्रसिद्धी तर मिळालीच पण त्याला इतर रिअॅलिटी शोच्या ऑफर्सही मिळाल्या. मात्र काही काळाने अभिजीत सावंत लाइमलाईटपासून दूर गेला.

अभिजीत सावंत त्याची पत्नी आणि दोन मुलींसह मुंबईत राहतो. त्यांनी गायनालाच त्याचे सर्वस्व बनवले आहे. त्याची पत्नी शिल्पा सावंतने अभिजीतसोबत नच बलिएमध्ये भाग घेतला होता.

अभिजीत सावंतने आपल्या स्वरांनी गायनाचे विश्व निर्माण केले आहे. जर आपण त्याच्या सध्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोललो, तर तो त्याच्या प्रसिद्ध गाण्याच्या 'लफ्जों में' च्या रिक्रिएट व्हर्जनमुळे चर्चेत आहे. या गाण्यासाठी त्याने YouTuber आणि संगीत निर्माता मयूर जुमानीसोबत कोलॅब केले आहे.

गाण्याच्या रिक्रिएट व्हर्जनमध्ये मयूरने वेगळीच ताल धरला आहे. नवीन व्हर्जन ऐकल्यानंतर चाहत्यांना जुने गाणे देखील नक्की आठवले.

'लफ्जों में' हे अभिजीतच्या पहिल्या अल्बम 'आपका अभिजीत सावंत' मधील एक आयकॉनिक गाणे आहे. हे एक प्रेम गीत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री तमन्ना भाटिया होती. समीरने लिहिलेले गीत आणि बिद्दूने संगीतबद्ध केलेले हे गाणे हृदयाला भिडते. जवळजवळ दोन दशकांनंतरही प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे हे एव्हरग्रीन गाणे बनले आहे.

मयूर जुमानी हे गाणे पुन्हा तयार करण्याची संधी मिळाल्याने भारावून गेला आहे. ज्याला सर्वांचे प्रचंड प्रेम मिळाले आहे. कैलाश खेर सारख्या संगीत क्षेत्रातील नामवंत नावांसोबत काम केल्यामुळे, मयूरला या क्षेत्रात सर्वाधिक मागणी आहे. 'लफ्जों में' ची व्हर्जन ऐकल्यावर, हे गाणे सहज दोन पिढीतील अंतर दूर करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT