Aastad Kale SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aastad Kale : आस्तादने 'कलावंत' ढोल ताशा पथकाला रामराम ठोकला, 'या' कलाकराने व्यक्त केली नाराजी

Saurabh Gokhale Reaction On Aastad Decision : अभिनेता आस्ताद काळे यांने 'कलावंत' ढोलताशा पथक सोडले. यावर सौरभ गौखले यांनी आपली प्रतिक्रिया देऊन नाराजी व्यक्त केली आहे.

Shreya Maskar

गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईसोबत पुण्यातही गणपतीचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे. पुण्यातील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कलावंतांचे ढोलताशा पथक होय. हे पुण्यातील (Pune) मानाच्या गणपतींचे मुख्य आकर्षण असते.

अनेक दिवसांपासून हे कलावंतांचे ढोलताशा पथक चांगले चर्चेत पाहायला मिळत आहे. हे ढोलताशा पथक अनेक वर्षांपासून मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका गाजवत आहेत. कलावंतांचे ढोलताशा पथकाचा सदस्य अभिनेता आस्ताद काळे सध्या चर्चेत आहे. आस्तादने ढोलताशा पथक सोडले आहे. याचा खुलासा स्वतः आस्ताद काळे यांनी सोशल मीडियावर केला आहे. काही दिवसांपूर्वी आस्तादने सोशल मिडियावर एक पोस्ट करून ही बातमी दिली. तेव्हापासून ढोलताशा पथक चर्चेत आले आहे.

आस्ताद काळेने (Aastad Kale) पोस्टमध्ये लिहिलं आहे की, मी कलावंत पथक सोडलं आहे. आता माझा कलावंत ढोलताशा पथकाशी (Kalavant Dhol Tasha Pathak) काही संबंध नाही. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. अनेक जण यावर आपली नाराजी व्यक्त करत आहे. तर अनेक जणांना या मागचे कारण जाणून घ्यायचे आहे. पण आजवर या पथकातील इतर सदस्यांनी कोणतीही कमेंट केली नाही आहे. मात्र आता अभिनेता सौरभ गोखले (Saurabh Gokhale ) यांने यावर आपले मत व्यक्त केले आहे. सौरभ देखील कलावंत ढोलताशा पथकाचा सदस्य आहे. त्यांनी हा निर्णय कुणालाही पटला नसल्याचे सांगितले आहे.

सौरभ गोखलेचे मत

सौरभ गोखलेने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत यावर भाष्य केले आहे. आस्ताद काळेने ढोलताशा पथकाशी संबंध तोडल्यावर प्रश्न विचारताच सौरभ उत्तर दिले की, एखादा ग्रुप म्हटलं की मतभेद होतातच. हा वाद असा नव्हता. आमची मते वेगवेगळी होती. त्याची गोष्टी काही आम्हाला पटत नव्हत्या तर आमच्या काही गोष्टी त्याला पटत नव्हत्या. त्याचा हा निर्णय जरी त्याला योग्य वाटला असेल तरी आम्हाला तो खूप टोकाचा वाटला. याची काही गरज नव्हती. पण हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे, यावर आम्ही बोलणे योग्य राहणार नाही. प्रत्येक न आवडणारी गोष्टी सोडणे हा काय उपाय नाही. यावर भाष्य न करणे हेच आमच्यासाठी योग्य आहे. कारण ही खूप वैयक्तिक गोष्ट होती, जी सोशल मीडियावर आली. असे वक्तव्य सौरभने केल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Raj Thackeray School: राज ठाकरेंचं शिक्षण दादरच्या या शाळेत झालं आहे

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

SCROLL FOR NEXT