आरपार हा सिनेमा नुकताच चित्रपट गृहात प्रसारित झाला आहे. ज्यात ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिका साकारत आहेत. चित्रपटामध्ये प्रेम, भावनिक संघर्ष आणि नात्यामधील गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांनी आपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. त्यांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड भावला आहे. यामध्ये नव तरुणांचे सध्याचे रिलेशनशिप कसे असते? याचा संपूर्ण प्रवास दाखवला आहे. प्रेमाच्या वेडेपणाला, संघर्षाला, नात्यांच्या गुंतागुंतीला प्रेक्षकांच्या मनात खोलवर पोहोचविण्याचा प्रयत्न करतो.
तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला' या गाण्याने ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे आरपार सिनेमा पाहताना डोक्यात फिरताना दिसतात. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौरव पतकी याने केले आहे. चित्रपटामध्ये विशेषतः नवतरुणांच्या सध्याच्या रिलेशनशिपचे वास्तववादाचे चित्रण केले गेले आहे.
नात्यातील चढउतार, असुरक्षितता, प्रेमाचे वेडेपण आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष हे कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणि तरुणाईच्या जीवनाच्या जवळ जाणारा हा चित्रपट आहे. त्यामध्ये महिलांना पुर्णपणे स्वातंत्र्य आहे. महिलांचे प्रत्येक पात्र हे स्वत:च्या पायावर भक्कम उभे आणि शिक्षणाने समृद्ध असलेले आहे. तरुणाई जरी दाखविली असली तरी त्याच्या करिअरबद्दल काही मुद्दे यामध्ये ठळक मांडलेले पाहायला मिळाले आहेत.
दिग्दर्शकाने कथानक साधे ठेवत त्याला भावनिक उंची देण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्ये प्रेक्षकांना विचार करायला लावतात. विशेष म्हणजे, प्रेमकथेतील गोडवा आणि वेदना दोन्हींचा उत्तम मेळ साधल्यामुळे सिनेमाचे वजन अधिक वाढले आहे. आरपार ही फक्त प्रेमकथा नसून नात्यांच्या गाभ्याशी पोहोचणारा प्रयत्न आहे. ज्यांना नात्यांतील वास्तव, भावनिकता आणि केमिस्ट्री अनुभवायला आवडते, त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा. तरुणाईसाठी हा सिनेमा रिलेशनशिपवर विचार करायला लावणारा ठरतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.