Aishwarya Rai CANVA
मनोरंजन बातम्या

Aishwarya Rai Bachchan: "अभिनेता हात मिळवायला आला पण ती पाया पडली" ऐश्वर्याच्या लेकीनं जिंकली मनं, व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल!

Aaradhya Bachchan Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चोत आहे. दरम्यान आराध्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Saam Tv

मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन त्यांच्या नात्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसत नाहीत. या व्हिडिओंमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरू लागल्या आहेत. काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लाकडी मुलगी आराध्याची सर्वत्र चर्चा आहे. नुकताच SIIMA अवॉर्ड्स पार पडले ज्यामध्ये ऐश्वर्या आणि तिची लाडकी मुलगी देखील सहभागी होते.

या अवॉर्ड्स दरम्यान आराध्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये आराध्याला सोशल मीडियावर भरपूर ट्रोल केलं जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आराध्या सुपरस्टार शिव कुमार यांना भेटली आणि तेव्हा तिने असे काही केले ज्यामुळे तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या व्हिडिओच्या माध्यनातून आराध्याच्या ट्रोलर्सला चांगलचं प्रतिउत्तर मिळालं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अवॉर्ड फंक्शनदरम्यान ऐश्वर्या राय स्टेजवर पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. त्यानंतर ऐश्वर्या स्टेजवरुन खाली येताच आराध्या धावत येऊन तिला एक घट्ट मिठी मारते. आई आणि मुलीच्या अतूट प्रेमाचा हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यादरम्यान तिथे सुपरस्टार शिवा कुमार देखील उपस्थित होते. त्यांना पाहताच ऐश्वर्या आणि आराध्या त्यांची भेट घेण्यासाठी गेले आणि ऐश्वर्याने तिच्या मुलीची ओळख करुन दिली . शिव कुमार यांनी आराध्याला हस्तांदोलन करण्यासाठी हाथ पुढे केला. परंतु आराध्याने त्यांचे चर्ण स्पर्श करत त्यांचे आशिर्वाद घेतले.

आराध्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे आराध्याचे सर्व चाहते भरभरुन कौतुक करत आहेत. या व्हिडिओला चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "ती बच्चन कुटुंबाची मुलगी आहे, तिला कधी काय करायचे ते माहित आहे" असे देखील अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT