Amir And Raj Saam
मनोरंजन बातम्या

Amir Khan: 3 इडियट्सनंतर आमिर अन् राजकुमार पुन्हा एकत्र, आता दिग्गजावर येणार बायोपिक

Dadasaheb Phalkes Life Story: परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

Bhagyashree Kamble

परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत लवकरच बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटामध्ये आमिर खान मुख्य भुमिका साकारणार असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता प्रत्येक चित्रपटप्रेमिंना लागली आहे.

भारत सरकारकडून दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्यांच्या नावाने आहे, त्या व्यक्तिमत्वाची कथा आजपर्यंत हिंदी सिनेमात साकारण्यात आली नव्हती, ही बाबच आश्चर्यकारक होती. मात्र, दादासाहेब फाळके यांचा जीवनप्रवास लवकरच रूपरी पद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. 'सितारे जमीन पर'च्या प्रदर्शनानंतर आमिर खान लवकरच या भूमिकेसाठी तयारी सुरू करणार आहेत. चित्रपटासाठी लॉस एंजलिसमधील व्हीएफएक्स स्टुडिओंनी त्या काळातील युगदर्शक डिझाइन्स आधीच एआयच्या साहाय्याने तयार केली आहेत.

या चित्रपटाच्या लेखनावर राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज हे चार लेखक गेले चार वर्षे झाले काम करत आहेत. विशेष म्हणजे, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसळकर यांनी या प्रकल्पासाठी आपला पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांनी त्यांच्या आजोबांच्या आयुष्यातील अनेक खास आठवणी आणि प्रसंग शेअर केले आहेत, जे पटकथेसाठी अत्यंत मौल्यवान ठरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात भाजपला धक्का,नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

Kalyan News: धक्कादायक! १९ व्या मजल्यावरून उडी घेत १४ वर्षीय मुलीची आत्महत्या, हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्हीत कैद

Palghar Tourism : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

SCROLL FOR NEXT