Aamir-Sunny Movie SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir-Sunny Movie : आमिर खान अन् सनी देओलच्या 'लाहोर १९४७' चित्रपटाचे नाव बदलले; रिलीज डेट आली समोर, नवीन शीर्षकाने वेधलं लक्ष

Lahore 1947 Movie Renamed : आमिर खान आणि सनी देओलच्या 'लाहोर १९४७' चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. यामागे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात. चित्रपटाची नवीन रिलीज डेट पाहा.

Shreya Maskar

'लाहोर १९४७' चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे.

'लाहोर १९४७' चित्रपटात मुख्य भूमिकेत सनी देओल झळकणार.

'लाहोर १९४७' चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे.

वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असलेला आमिर खान आता त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आला आहे. बॉलिवूड स्टार आमिर खान आणि सनी देओल यांचा आगामी चित्रपट 'लाहोर १९४७' बद्दल मोठे अपडेट समोर आले आहे. चित्रपटाचे नाव बदलले आहे. सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी 'लाहोर १९४७' या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर कमबॅक आहेत. आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत निर्मित या देशभक्तीपर चित्रपटाची 2023 मध्ये घोषणा करण्यात आली.

'लाहोर १९४७' चित्रपट प्रदर्शित होण्याच्या चार महिन्या आधी निर्मात्यांनी चित्रपटात एक मोठा बदल केला आहे. सिनेमाचे शीर्षक बदलले आहे. 'लाहोर १९४७' बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. TOIच्या वृत्तानुसार, 'लाहोर १९४७' च्या निर्मात्यांनी रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच त्याचे शीर्षक बदलले आहे.

आता सनी देओलचा हा चित्रपट 'बटवारा १९४७' या नवीन नावाने थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय, सामाजिक मतभेद लक्षात घेता निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांना चित्रपटाभोवती कोणताही वाद नको आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप लाहोर १९४७ चे नाव बदलण्याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.

'लाहोर १९४७' हा चित्रपट स्वातंत्र्यादरम्यान देशाच्या फाळणीभोवती फिरतो, जो भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा अधोरेखित करणार आहे. सनी देओल, आमिर खान व्यतिरिक्त चित्रपटात अजी फलाज, शबाना आझमी, अभिमन्यु सिंह, करण देओल, प्रीती झिंटासारखे तगडे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याचे बोले जात आहे.

'लाहोर १९४७' रिलीज डेट

'लाहोर १९४७' चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपट 13 ऑगस्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहेत. राजकुमार संतोषी आणि सनी देओल खूप वेळाने एकत्र काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Orange Ice Cream : विकतचं कशाला? मुलांसाठी घरीच बनवा संत्र्याचं आईस्क्रीम; जिभेवर रेंगाळेल चव, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीत सिंग याची चौकशी करू नका, शरद पवार पक्षाची मागणी

Crime: अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपहरण करून ३ दिवस डांबून ठेवलं; ६ जणांनी शरीराचे लचके तोडले

Share Market Crash : सर्वात मोठी घसरण, शेअर मार्केटमध्ये काही सेकंदात १२ लाख कोटी बुडाले;रूपयाही घसरला अन् क्रूड ऑइलही महागले

WhatsApp New Feature: भन्नाटच! WhatsApp चॅटिंगमध्ये आणखी एक भन्नाट पर्याय, समोरच्याला एका क्षणात करा इम्प्रेस

SCROLL FOR NEXT