पवारांची राजकीय कारकीर्द 'साठी'च्या उंबरठ्यावर, शरद पवारांनी भूषवले चारही सभागृहाचे सदस्यपद

Sharad Pawar 59 Years Political Career In Maharashtra: शरद पवारांची राजकीय कारकीर्द साठीच्या उंबरठ्यावर पोहचलीय... शरद पवारांनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती पद भूषवली आहेत?. महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांची राजकीय कारकीर्द कशी आहे? पाहूयात....
Veteran leader Sharad Pawar completes nearly six decades as a public representative in Indian politics.
Veteran leader Sharad Pawar completes nearly six decades as a public representative in Indian politics.Saam Tv
Published On

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हणून शरद पवारांकडे नेहमीच आदरानं पाहिलं जातं....अशातच शरद पवारांच्या राज्यसभेवरील निवडीची औपचारिकता बाकी असली तरी गेल्याच आठवड्यात त्यानी लोकप्रतिनिधीपदाची 59 वर्ष पूर्ण केलेत... आता पवारांची संसदीय आणि विधीमंडळाची कारकीर्द साठीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलीय...त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी राहिलीय..

1967 मध्ये पवार पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले..1978 साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडून गेले.. त्यानंतर 1984 मध्ये त्यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभेत प्रवेश केला...1985 मध्ये ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले.. त्यानंतर 1991 ते 2014 पर्यंत त्यांनी पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं...1993 मध्ये ते पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.. तेव्हा त्यांनी विधान परिषदेची आमदारकी भूषविली.. तर 2014, 2020 राज्यसभेवर निवडून आले... त्यामुळे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषद अशी संसदीय प्रणालीतील चारही सभागृहाचं सदस्यपद त्यांनी भूषवलंय...

- दरम्यान 50 वर्ष किवा त्यापेक्षा अधिक काळ संसद किंवा विधीमंडळात प्रतिनिधीत्व केलेले नेते पाहूयात..

5 दशकांची राजकीय कारकीर्द

एम. करुणानिधी - 60 वर्ष

शरद पवार- 59 वर्ष

गणपतराव देशमुख- 54 वर्ष

ओमान चॅण्डी- 53 वर्ष

अटलबिहारी वाजपेयी- 50 वर्ष

बाबू जगजीवनराम- 50 वर्ष

प्रकाशसिंह बादल- 50 वर्ष

दरम्यान 1998 आणि 1999 मध्ये जेव्हा लोकसभा बरखास्त झाली होती.. तो काळ वगळता शरद पवार हे सलगपणे कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेत.. त्यामुळे केवळ निवडणुका जिंकणे महत्त्वाचे नाही, तर 60 वर्षे जनतेचा विश्वास टिकवून ठेवणे ही मोठी बाब आहे. म्हणूनच 'लोकनेते' ही पदवी सार्थ ठरवणारे शरद पवार आजही तितक्याच उत्साहाने राजकारणात सक्रिय आहेत. 2027 मध्ये जेव्हा ते आपल्या कारकिर्दीची 60 वर्षे पूर्ण करतील, तो क्षण केवळ त्यांच्या समर्थकांसाठीच नव्हे, तर भारतीय राजकारणातील सुवर्णक्षण असेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com