Aamir Khan Girlfriend  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Girlfriend : आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार; साठीत गौरीच्या प्रेमात वेडापिसा, 'ती' नक्की काय करते?

Who is Gauri Spratt : बॉलिवूड अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्याने आपल्या ६०व्या वाढदिवसाला त्याच्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली आहे. गौरी स्प्रॅट नेमकी कोण जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आता तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. स्वतःच्या वाढदिवसाला त्यांनी आपल्या नव्या नात्याचा खुलासा केला आहे. आज आमिर खानचा वाढदिवस आहे. आमिर खान आज 60 वर्षांचा झाला आहे. काल रात्री त्यांनी आपल्या वाढदिवसाची मोठी पार्टी दिली. या बर्थडे पार्टीमध्ये आमिर खानने त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली आहे. तेव्हा पासून आमिर खानला डेट करणारी मुलगी कोण आहे, याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

आमिर खानने मिडिया समोर खुलासा केला की, "तो त्याची जुनी जुनी मैत्रीण गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. मी गौरीला (Gauri Spratt) गेली 25 वर्ष ओळखत आहे आणि आम्ही 18 महिन्यांपासून तो रिलेशनशिपमध्ये आहोत. " पुढे आमिर म्हणाला की, "गौरीची मीडियाला ओळख करून देण्यापूर्वी मी सलमान खान आणि शाहरुख खानसोबत बोलो होता आणि तिची ओळख त्यांना करून दिली होती."

कोण आहे गौरी स्प्रॅट?

बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानच्या नव्या गर्लफ्रेंडचे नाव गौरी स्प्रॅट (Aamir Khan girlfriend Gauri Spratt) आहे. ती बंगळुरूची रहिवासी आहे. गौरी आमिर खानच्या प्रोडक्शन बॅनरखाली काम करते. गौरीची आई तामिळ तर वडील आयरिश आहेत. गौरी स्प्रॅटला सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. गौरीने ब्लू माउंटन स्कूलमधून शिक्षण घेतले असून २००४ मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा फॅशन कोर्स केला.

गौरी स्प्रॅट ही बंगळुरूमध्ये सलूनची मालकीण असलेल्या रीता स्प्रॅट यांची मुलगी आहे. गौरीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, गौरी आता मुंबईतही बीब्लंट सलून चालवत आहे. आमिर खान आणि गौरी सध्या एकत्र राहत आहेत. गौरी आणि आमिर खानच्या नात्याला कुटुंबाकडून देखील संमती आहे.

आमिरचे वैयक्तिक आयुष्य

आमिर खानचे पहिले लग्न रीना दत्तासोबत 1986 मध्ये झाले असून त्यांचा घटस्फोट 2006 मध्ये झाला. त्यानंतर आमिर खानने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केले. यांचा घटस्फोट 2021 मध्ये झाला. किरण रावसोबत घटस्फोटानंतर आमिर खान आता गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. आमिर खानने 2024 पासून गौरीला डेट करायला सुरुवात केली आणि आता 2025 मध्ये त्यांनी आपले नाते अधिकृत केले. आता सोशल मीडियावर यांच्या लग्नची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप यावर कोणताही खुलासा झाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, प्रवीण दीक्षित यांचे मत

Ind Vs Sa: चौथ्या सामन्यात बुमराह करणार कमबॅक? पाहा सिरीज जिंकण्यासाठी कशी असेल भारताची प्लेईंग 11

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Madhuri Dixit Photos : "परी हो या हो परियों की रानी..."; गुलाबी ड्रेसमध्ये 'धक धक गर्ल'चं आरस्पानी सौंदर्य

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT