Aamir Khan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Aamir Khan: "श्वासही घ्यायला देणार नाही..."; सलमाननंतर आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर, सोशल मीडियावर धमकी

Aamir Khan Gets Threat From Bishnoi Gang : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर धमकीची पोस्ट व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

आमिर खानला बिश्नोई गँगकडून धमकी

धमकीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ

सलमान खाननंतर आता बॉलिवूडचा आणखी एक खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला टार्गेट केले आहे. आरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई या गुंडांनी सोशल मीडियावरील एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिपद्वारे अभिनेत्याला जीवे मारण्याची गंभीर धमकी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये बिश्नोई टोळीने आमिर खानवर 'लव्ह जिहाद'चा आरोप करून धमकी दिली आहे.

व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?

"जय श्री राम

मी, आरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप), आमिर खानसारख्या लोकांमुळे आपल्या देशात 'लव्ह जिहाद'च्या नावाखाली आपल्या संस्कृतीच्या विरोधात असलेल्या या गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. आम्ही हे कृत्य सहन करणार नाही आणि लवकरच प्रत्युत्तर देऊ. हे आपल्या सनातन धर्माच्या आणि देशाच्या विरोधात आहे. आम्ही आमच्या बंधू-भगिनींना आणि देशबांधवांना वचन देतो की, जो कोणी या घृणास्पद कृत्याला प्रोत्साहन देईल, त्याला आम्ही आमच्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊ. जे स्टारडमच्या नावाखाली याला प्रोत्साहन देत आहेत, त्यांचा आम्ही गळा दाबू. श्वासही घ्यायला देणार नाही.

राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये एका निष्पाप मुलीसोबत झालेल्या क्रूरतेबद्दलही मी तीव्र चिंता व्यक्त करतो. प्रशासनाने खूप चांगले काम केले आहे, परंतु काही राजकीय व्यक्ती या गुन्हेगारांपैकी काहींना संरक्षण देत आहेत. हा आमचा पहिला आणि अंतिम इशारा आहे. त्या निष्पाप मुलीसोबत जे घडले त्यात जो कोणी किंचितही सामील असेल आणि कायद्याच्या तावडीतून निसटला असेल, त्याला आम्ही निश्चितपणे शिक्षा देऊ, परंतु जे राजकारणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी यात हस्तक्षेप करणे तात्काळ थांबवावे, अन्यथा त्यांचीही तीच गत होईल. थोडी माणुसकी दाखवा. आमचे दोन शहीद बंधू, परवेश आणि हिमांशू, आमच्या हृदयात सदैव राहतील आणि आम्ही तुमचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही शत्रूंना सडेतोड उत्तर देऊ. देव तुम्हा दोघांच्या आत्म्यांना शांती देवो."

bishnoi gang gives threat to aamir khan

आमिर खानला मिळालेल्या या धमकीमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. धमकीच्या या व्हायरल पोस्टमुळे आमिर खानची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच या व्हायरल पोस्टवर आमिर खान आणि त्याच्या टीमची देखील कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. व्हायरल पोस्टच्या सत्यतेची पडताळणी सध्या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakshabandhan Horoscope: रक्षाबंधनाचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार खास? भावंडांकडून मिळेल प्रेम, आनंद आणि मोठी खुशखबर!

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

Facebook, INSTA वर दररोज 6 तासांची बंदी; 18 वर्षांखालील मुलांसाठी कडक नियम

Punjab Politics: भाजप आणि शिरोमणी अकाली दलाची युती होणार की तुटणार? दोन्ही पक्षातील नेमका तिढा काय?

खाऊन पिऊन आंदोलन करा, झिरवाळांचा आदिवासी आंदोलकांना अजब सल्ला

SCROLL FOR NEXT