Fort In Raigad : शत्रूंना कायम आव्हान देणारा जलदुर्ग; समुद्राच्या लाटांमध्ये दडलाय राजेशाही इतिहास, सुट्ट्यांमध्ये 'हा' किल्ला पाहाच

Shreya Maskar

रायगड

महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील अरबी समुद्रात एका बेटावर वसलेला मुरुड-जंजिरा हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मजबूत जलदुर्गांपैकी एक आहे. राजपुरी जेट्टीवरून बोटीने अवघ्या १५-२० मिनिटांत किल्ल्यावर पोहचता येते.

Raigad | pinterest

मुरुड-जंजिरा किल्ला

मुरुड-जंजिरा किल्ला हा १५ व्या शतकातील एक सागरी दुर्ग आहे. मुरुड-जंजिरा किल्ला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे.

Murud-Janjira Fort | pinterest

किल्ला कोणी बांधला?

मुरुड-जंजिरा किल्ला १५व्या शतकात समुद्रातील चाच्यांपासून बचाव करण्यासाठी स्थानिक कोळी समाजाने बेटावर लाकडी स्वरूपात बांधला होता. पुढे इ.स. १५६७ मध्ये अहमदनगर सल्तनतचा सरदार मलिक अंबर याने या लाकडी किल्ल्याच्या जागी भक्कम दगडी तटबंदी उभारून सध्याचा जंजिरा किल्ला तयार केला.

Who Built the Fort? | pinterest

अजिंक्य किल्ला

मुरुड-जंजिरा हा अजिंक्य किल्ला आहे. ब्रिटिश, पोर्तुगीज,डच आणि मराठ्यांनाही मुरुड-जंजिरा किल्ला जिंकता आला नाही. इतिहासात या किल्ल्याला मोठे महत्त्व आहे.

The Invincible Fort | pinterest

गोड्या पाण्याचे तलाव

चारही बाजूंनी समुद्राच्या खाऱ्या पाण्याने वेढलेला मुरुड-जंजिरा किल्ला असूनही या किल्ल्यामध्ये गोड्या पाण्याचे दोन नैसर्गिक तलाव आहेत. हे पाणी पिण्यायोग्य असून, ते कुठून येते हे अजूनही एक रहस्य आहे.

Freshwater Tanks | pinterest

तोफा

मुरुड-जंजिरा किल्ल्यावर एकेकाळी सुमारे ५७२ तोफा होत्या. यातील कलालबांगडी, चावरी, आणि लंडाकसम या तीन प्रचंड आकाराच्या तोफा त्यांच्या जबरदस्त मारक क्षमतेसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त गायमुख आणि लांडा यांसारख्या इतर तोफाही या गडावर पाहता येतात.

Cannons | pinterest

लपलेले प्रवेशद्वार

मुरुड-जंजिरा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे त्याच्या गुप्त आणि अभेद्य रचनेसाठी प्रसिद्ध आहे. मुख्य दरवाजा बरोबर तटाच्या मागे लपलेला आहे. अगदी जवळ (सुमारे ४० फूट अंतरावर) गेल्याशिवाय तो पर्यटकांच्या नजरेत येत नाही. प्रवेशद्वाराच्या बाहेरील भिंतीवर एक अद्वितीय शिल्प कोरलेले आहे. रिपोर्टनुसार, मुरुड-जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी सध्या बंद ठेवण्यात आला आहे.

Hidden Entrance | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : छत्रपती शिवरायांचा 'सिंहगड' किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा? वाचा गौरवगाथा

Sinhagad Fort | saam tv
येथे क्लिक करा...