Sinhagad Fort : छत्रपती शिवरायांचा 'सिंहगड' किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा? वाचा गौरवगाथा

Shreya Maskar

पुणे

सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे शहराच्या नैऋत्येस साधारणपणे ३५ किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री पर्वतरांगेत १,३१७ मीटर (४,३२१ फूट) उंचीवर स्थित असलेला हा किल्ला ट्रेकिंग, निसर्गरम्य दृश्यांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे.

Pune | google

सिंहगड किल्ल्याचे जुने नाव काय?

सिंहगड किल्ल्याचे मूळ नाव 'कोंढाणा' होते. तेथे कौंडिण्य ऋषींनी तपस्या केली होती, त्यामुळे त्यांच्या नावावरून या गडाला 'कोंढाणा' असे नाव पडले.

What was the old name of Sinhagad Fort? | google

छत्रपती शिवाजी महाराज

१६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे कोंढाणा नाव बदलून 'सिंहगड' केले. 'सिंहगड' म्हणजे सिंहाचा किल्ला होय. पराक्रम, शौर्य, बलिदान, विजय याची कहाणी म्हणजे सिंहगड किल्ला होय.

Chhatrapati Shivaji Maharaj | google

गड आला, पण सिंह गेला...

छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे 'सिंहगड' नाव महान सेनापती तानाजी मालुसरे यांच्या सन्मानार्थ ठेवले. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरेंना वीरमरण आले होते. याच घटनेमुळे शिवाजी महाराजांनी "गड आला, पण सिंह गेला..." हे सुप्रसिद्ध उद्गार काढले.

The Fort was won, but the Lion was lost... | google

सिंहगड किल्ला कोणी बांधला?

कोंढाणा किल्ला इसवी सनाच्या ८ व्या शतकात राष्ट्रकूट राजवटीत बांधला गेला. सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे १,३१२ मीटर (४,३०० फूट) इतकी आहे. सह्याद्री पर्वतरांगेतील भुलेश्वर रांगेत असलेला हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे.

Who built Sinhagad Fort? | google

व्यापारी मार्ग

'कोंढाणा' म्हणून ओळखला जाणारा सिंहगड किल्ला दख्खनचे पठार आणि कोकण किनारपट्टी यांना जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर आपले वर्चस्व गाजवत होता. यामुळेच मराठा साम्राज्याच्या इतिहासात ज्या किल्ल्यांसाठी सर्वाधिक निकराच्या लढाया झाल्या, त्यापैकी हा एक प्रमुख किल्ला ठरला.

Trade Routes | google

कसं जाल?

मुंबईहून तुम्ही पुणे स्टेशनला उतरा. तेथून बस किंवा रिक्षाने तुम्ही 'सिंहगड' किल्ल्या पर्यंत पोहचाल. तसेच स्वारगेटवरून थेट सिंहगड पायथ्यापर्यंत (डोणजे गाव/गोळेवाडी) बस जाता.

How ​​to Get There? | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सह्याद्रीतील लोखंडी किल्ला! लोहगड किल्ल्याच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहितेय का?

Lohagad Fort | saam tv
येथे क्लिक करा...