Shreya Maskar
लोहगड हा लोणावळ्याजवळ वसलेला आहे. १८ व्या शतकातील एक भव्य आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता पावलेला किल्ला आहे.
१,०३३ मीटर उंचीवर लोहगड किल्ला आहे. येथे तुम्हाला ट्रेकिंगचा थरार अनुभवता येईल. हा किल्ला चार दरवाजे आणि सह्याद्रीच्या रांगा व पवना तलावाच्या नयनरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.
लोहगड किल्ला हे नाव 'लोहा' (लोखंड) आणि 'गड' (किल्ला) या दोन मराठी शब्दांवरून पडले आहे. याचा शब्दशः अर्थ 'लोखंडी किल्ला' (Iron Fort) असा होतो. त्यामुळे लोहगड किल्ला हा 'लोहगड' किंवा 'लोखंडी किल्ला' म्हणूनही ओळखला जातो.
ऐतिहासिक नोंदींनुसार लोहगड किल्ला हा 'गोपगिरी' किंवा 'गोप' नावाच्या टेकडीवर (डोंगररांगेत) वसलेला आहे. या टेकडीवरून सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.
लोहगड किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, मुघल, आदिलशाही आणि मराठा साम्राज्यांनी या किल्ल्यावर राज्य केले आहे. १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ला जिंकून मराठा साम्राज्यात सामील केला.
लोहगड किल्ला अभेद्य तटबंदी आणि चार भव्य दरवाजांच्या सापासारख्या नागमोडी रचनेसाठी ओळखला जातो, जो सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत मजबूत आहे.
लोहगड किल्ला पाहायला उन्हाळी सु्ट्टीत नक्की जा. लोहगड किल्ला मुख्य उद्देश सुरक्षा, खजिन्याचे रक्षण आणि व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवणे हा होता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.