Aamir Khan Kiara Advani  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan Advertisement: आमिर खानच्या जाहिरातीवरून वाद, यापूर्वी 'या' जाहिरातीही हटवल्या होत्या

आमिर खान आणि कियारा अडवाणीच्या एका जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Aamir Khan Kiara Advani) यांच्या एका जाहिरातीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एयू बँकेच्या (Bank) एका जाहिरातीमुळे हिंदू धर्म मानणाऱ्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सुद्धा या जाहिरातीला विरोध केला आहे. नरोत्तम मिश्रा यांचे म्हणणे आहे की अशा जाहिरातींमुळे धर्माच्या भावना दुखावत आहेत, धार्मिक परंपरा आणि प्रथा यांचे भान असू द्या. यापूर्वीही निरोत्तम मिश्रा यांनी अशा अनेक जाहिरातींना विरोध केला होता आणि त्यानंतर कंपन्यांना त्या जाहिराती काढाव्या लागल्या.

आमिर खानवर (Aamir Khan) यापूर्वीही अनेकदा हिंदूंच्या भावना दुखावल्याचे आरोप झाले आहेत. याआधीही अशा अनेक जाहिराती आमिर खान याने केल्या आहेत ज्यामुळे वाद निर्माण झाले आहेत आणि हे वाद शांत करण्यासाठी जाहिराती हटविण्यात आल्या आहेत.

आमिर आणि कियाराच्या जाहिरातीत (Advertisement) कोणती गोष्ट वादग्रस्त मानली जात आहे ते पाहूया. या जाहिरातीत कियारा लग्नानंतर तिच्या वराला म्हणजेच आमिर खानला तिच्या घरी घेऊन येते आणि तिचे संपूर्ण कुटुंब वरचा गृहप्रवेश करतात. कियाराचे वडील आजारी असल्यामुळे आमिर त्यांची सेवा करण्यासाठी येतो असे या जाहिरातीमध्ये दाखविण्यात आले आहे. शतकानुशतके चालत आलेली प्रथा पूर्णपणे बदलली असल्याचा आरोप या जाहिरातीवर केला जात आहे.

यापूर्वी ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोची (Zomato) जाहिरात लोकांनी नाकारली होती. या जाहिरातीमध्ये हृतिक रोशन महत्त्वाच्या भूमिकेत होता. जाहिरातीमुळे निर्माण झालेल्या वादामुळे जाहिरात हटविण्यात अली होती. हृतिक रोशनला उज्जैनमध्ये थाळी हवी होती, मग ती त्याने महाकालकडून मागितली. अशा आशयाची ती जाहिरात होती. महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर ती जाहिरात हटविण्यात आली होती

मान्यवरची एक जाहिरात सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्या जाहिरातीमध्ये कन्यादान ऐवजी कन्यामनबद्दल भाष्य करण्यात आले होते. या जाहिरातीत आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत होती. मुलगी ही दान करण्यासारखी गोष्ट नाही, असे डायलॉग आलियाला देण्यात आले होते. आता कन्यादान होणार नाही कन्यामान होणार, असा आशय त्या जाहिरातीत होता.

तनिष्क कंपनीच्या जाहिरातीचा सुद्धा या यादीत समावेश आहे. तनिष्कच्या जाहिरातीमध्ये एका मुस्लिम कुटुंबातील महिलेचा विवाह दाखवण्यात आला आहे. मुस्लिम कुटुंब हिंदू धर्मानुसार सर्व विधी, प्रथा पार पाडतात, असे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे. जाहिराती लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचे आरोप करण्यात आले. या यादीमध्ये सरफेक्सल, मॅनफोर्स इत्यादी अनेक जाहिरातींचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT