Littile Cute Boy Amchya Pappani Ganpati Anala Video Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amchya Pappani Ganpati Anala: ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ रातोरात स्टार झालेला चिमुकला रीलस्टार आहे तरी कोण?

Littile Cute Boy Video Viral: सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याच्या आवाजातील ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावरील रिल प्रचंड व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Littile Cute Boy Amchya Pappani Ganpati Anala Video Viral

दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आपल्याला काही तरी नवीन संकल्पना, नवीन फॅशन किंवा नवा ट्रेंड पाहायला मिळतो. श्रावण महिना सुरू झाला की, बाजारामध्ये, गणेश मुर्तीच्या कार्यशाळेत आणि मोठ मोठ्या गणपती मंडळांमध्ये गणेशोत्सवाची धुम पाहायला मिळते.

आज ऑगस्ट महिन्याचा अखेरचा दिवस असून उद्यापासून सप्टेंबर महिन्याला सुरूवात होत आहे. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला असून सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका लहान मुलाच्या आवाजात सध्या सोशल मीडियावर एक गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक नवनवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अशातच यावर्षी देखील प्रेक्षकांच्या भेटीला यंदाच्या गणेशोत्सवातील एक गाणं भेटीला आलं आहे. हे गाणं एका चिमुकल्याने गायलं असून त्याच्या आवाजत ते गाणं ऐकायला खूपच सुंदर वाटत आहे.

सध्या गाणं अगदी लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडी ते गाणं ऐकायला येत आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर एका शाळकरी मुलानं डान्स केला असून त्याच्या स्टेप पाहून आणि त्याचे हावभाव पाहून तुम्ही देखील नक्कीच थक्क व्हाल. (Song)

गाण्यामध्ये त्याचं ‘टुकुमुकु बघतोय चांगला’ या ओळीवर त्याने जो अभिनय केला आहे, त्यामुळे त्याने सर्वांचेच मन जिंकून घेतले आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आवडेल याच्यात तिळमात्र शंका नाही. सध्या त्या चिमुकल्याची व्हिडीओ प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्याची व्हिडीओ स्टोरीवर देखील शेअर केली आहे. त्याच्या अभिनयाला नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतोय. (Social Media)

साईराज केंद्रे या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. अवघ्या ४ वर्षांचा असलेला हा चिमुकला बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी या गावातील रहिवाशी आहे. साईराजच्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडी मधील माऊली अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमधील साईराज विद्यार्थी आहे. साईराजने शाळेच्या गणवेशात व्हिडिओ शूट केल्यामुळे त्याच्या शाळेचीही सध्या सर्वत्र चर्चा होते. (Viral Video)

खरंतर गाण्याबद्दल सांगायचं तर, ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ हे गाणं यावर्षी प्रदर्शित झालं नसून गेल्या वर्षीच हे गाणं प्रदर्शित झालं आहे. माऊली प्रॉडक्शनकडून हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्याला आतापर्यंत तब्बल तीन मिलियन्स इतके व्ह्यूज मिळाले आहेत. सध्या हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे. इन्स्टाग्रम, फेसबुक, युट्युबवर या गाण्याचे रिल्स प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे गाणं दोन चिमुकल्यांनी गायलं असून सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणं आपल्याला गणेश मंडळासह अनेक ठिकाणी ऐकाला मिळेल याच्यात काही शंका नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर शरद पवारांच्या भेटीला

Ardh Kendra Yog: 165 वर्षांनंतर या राशी छप्परफाड धन कमावणार; अर्धकेंद्र योगाने होणार भरभराट

गर्दीत लोकल पकडताना होत्याचं नव्हतं, धावत्या Local खाली महिला सापडली अन्...

Lunch And Dinner Time: दुपार आणि संध्याकाळच्या जेवणाची योग्य वेळ कोणती?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार? महत्त्वाचं कारण आले समोर, वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT