Aai Tuljabhavani Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Tuljabhavani Serial: आई तुळजाभवानी मालिकेत येणार नवा ट्विस्ट; भवानीशंकर रूपात दिसणार महादेव

Aai Tuljabhavani Serial New Twist: मालिकेत कद्दारासूराचा वध आई तुळजाभवानीच्या हातून होणार आहे. हे घडत असतानाच आई तुळजाभवानीची मदत करण्यासाठी भूतलावर भवानीशंकर रूपात महादेव येणार आहेत.

Manasvi Choudhary

कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेत भक्तांच्या मनाला भिडणारे अनेक प्रसंग बघायला मिळाले. बलाढ्य असुरांचा वध करणारी देवी तुळजाभवानी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आई आहे. मायेने जवळ घेणारी, लेकरांचा हट्ट पुरवणारी, योग्य मार्ग दाखवणारी आणि आपल्यावर संकट आलं तर त्वरित धावणारी अशी 'आई तुळजाभवानी'ची महागाथा सध्या कलर्स मराठीवर सुरु आहे. भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येत दुष्टांचा नाश करणारी देवी त्वरिता - तुळजा ते भक्तांवर अपरंपार माया करणारी आई तुळजाभवानी हा प्रवास कसा घडला हे प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.

सध्या मालिकेच्या कथाभागात कद्दारासूरने गावात उच्छाद मांडला होता, प्रत्येक भक्ताचे जगणे त्याने मुश्किल केले होते. नुकत्याच समोर आलेल्या भागामध्ये शिवकन्या अशोकसुंदरीला देखील आपल्या मायाजाळमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्याने केला जो महादेवांनी उधळून लावला. आता अखेर मालिकेत कद्दारासूराचा वध आई तुळजाभवानीच्या हातून होणार आहे. हे घडत असतानाच आई तुळजाभवानीची मदत करण्यासाठी भूतलावर भवानीशंकर रूपात महादेव येणार आहेत.

तुळजाभवानीच्या भक्तांसाठी कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी मालिकेचा महत्वपूर्ण कथाभाग आता उलगडणार आहे. दैवी दर्शनाचा परमोच्च बिंदु गाठणार आहे. महादेव पृथ्वीवर भवानीशंकर रूपात अवतरणार असून संकटात सापडलेल्या देवीच्या मदतीला देवांचे देव महादेव येत आहेत. प्रत्यक्ष पार्वती मातेच्या तुळजाभवानी अवताराला त्रास देणारे हे आसुरी संकट कोणते ? ते दूर करण्यासाठी महादेवांनी रांगडे भवानी शंकर रूप का घेतले ? मुलगी अशोकसुंदरीला महादेवांनी पृथ्वीवर राहण्याचे दिलेल्या वचनाचे काय होणार ? ते पूर्ण होईल का या अनेक प्रश्नांची उत्तरे या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

महादेव भूलोकावर येण्याचे प्रयोजन नक्की काय आहे ? पुढे काय घडणार ? या सगळ्याचे आपण सगळे साक्षिदार होऊया. पहा आई तुळजाभवानी दररोज रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर ! प्रसंगी योद्धा, पत्नी आणि अनंतकाळ माता रूपात भेटणाऱ्या देवीच्या तामस , राजस आणि सात्विक शक्तींचा प्रत्यय देणारा तुळजाभवानीचा प्रवास सुरु होणार आहे तो म्हणजे भवानी शंकरासोबत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : 'भाजप लोकांची घरं फोडून राजकारण करतं'- उद्धव ठाकरेंचा घणाघात

Karjat near waterfall: कर्जतपासून अवघ्या 20 किमीवर लपलाय 'हा' धबधबा; पावसाचा आनंद घेण्यासाठी बेस्ट ठिकाण

Shravan Month 2025: श्रावण महिन्यात काय करावे अन् काय करू नये?

Low Cost Bike: कमी बजेटमध्ये जास्त फायदे! ‘या’ १० बाईक्स अजूनही किफायतशीर

Paneer Cutlet Recipe: छोट्या भूकेसाठी १० मिनिटांत बनवा खंमग पनीर कटलेट

SCROLL FOR NEXT