Aai Tuljabhawani Serial canva
मनोरंजन बातम्या

Aai Tuljabhawani Serial: महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीची उलगडणार गाथा; 'ही' अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Aai Tuljabhawani Marathi Serial Promo: 'कलर्स मराठी' वाहिनीवर अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. 'आई तुळजाभवानी' या मालिकेत पूजा काळे मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

New Marathi Serial: धार्मिक आणि अध्यात्मिक मालिकांची परंपरा सर्व मराठी टेलिव्हिजन विश्वाला वर्षानुवर्ष पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वात आघाडीवर आहे 'कलर्स मराठी' वाहिनी. या वाहिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रिय आणि यशस्वी धार्मिक मालिका सातत्याने पाहायला मिळतात. 'कलर्स मराठी'वरील एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचं शीर्षक 'अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी' असे आहे. या मालिकेच्या माध्यमातून 'आई तुळजाभवानी'ची गाथा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मालिकेच्या माध्यमातून 'आई तुळजाभवानी'च्या रुपात प्रसन्नरुप लाभलेली अभिनेत्री पूजा काळे दिसणार आहे.

अभिनेत्री पूजा काळे नृत्यांगना असून ती भरत नाट्यमध्ये विशारद पूर्ण केले आहे. त्यासोबतच पूजा काळे हिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे. 'आई तुळजाभवानी' या मालिकेचा टीझर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. मालिकेचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चाहत्यांमध्ये मालिकेबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर मालिकेचा नवा प्रोमोदेखील प्रदर्शित करण्यात आला.

आता प्रदर्शत झालेल्या नव्या प्रोमोमध्ये 'आई तुळजा भवानी'चं अद्भत आणि अलौकिक रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये चाहत्यांना "आई तुळजाभवानी'च्या रौद्ररुपाचं दर्शन होणार आहे. अभिनेत्री पूजा काळे एका मुलाखाती दरम्यान म्हणाली की, आई तुळजाभवानीची भूमिका साकारताना मला माझ्या आसपास भरपूर सकारात्मक उर्जा जाणवते. ही माझी पहिली मालिका आणि आणि त्यात अध्यात्मिक भूमिका साकारताना माझ्यावर खूप मोठी जवाबदारी आहे."

"मालिकेच्या संपूर्ण टीम आणि राष्ट्रिय पुरसकार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली आई तुळजाभवानी ही भूमिका मनोभावेने साकारुन प्रेक्षकांच्या विश्वासाला खरं ठरेन असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला." अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' ही मालिका कलर्स मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भटीला येणार आहे.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री कामावरून निघाले, पण घरी पोहोचलेच नाही; पोलीस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

Bus Accident: चालकाला हार्ट अटॅक आला, ४० प्रवाशांना घेऊन जाणारी भरधाव बस उलटली

Crime News : पत्नी आणि मेव्हुणीनं गळा दाबून खून केला, साडूनं शेतात मृतदेह लपवला; बीडमधील हत्याकांडानं अख्खं राज्य हादरलं

Pune News: पवाना नदीत बुडून ३ तरुणांचा मृत्यू, पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली, पण बाहेर आलेच नाहीत...

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन; स्वागतावेळी हेलिपॅडवर हायहॉल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT