Milind Gawali Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Milind Gawali: ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावुक, पोस्ट शेअर करत दिला अनेक आठवणींना उजाळा

Milind Gawali News: अभिनेते मिलिंद गवळीच्या आईची आज १५ वी पुण्यतिथी आहे. २ मार्च २००९ साली मिलिंद गवळीच्या आईचं निधन झाले. अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आईच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला आहे.

Chetan Bodke

Milind Gawali Post

टेलिव्हिजन अभिनेता मिलिंद गवळी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. मिलिंद गवळीने ‘आई कुठे काय करते’ मालिकेमध्ये अनिरुद्ध नावाचे पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मिलिंद गवळी कायमच सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. (Marathi Actor)

अभिनेता कायमच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर पोस्टमध्ये परखड मत मांडण्याचा प्रयत्न करतो. आज मिलिंद गवळीने इन्स्टाग्रामवर आईच्या आठवणीत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. त्यासोबतच पोस्टमध्ये आईचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

अभिनेते मिलिंद गवळीच्या आईची आज १५ वी पुण्यतिथी आहे. २ मार्च २००९ साली मिलिंद गवळीच्या आईचं निधन झाले. अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आईच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला आहे. (Social Media)

अभिनेता मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात,

“ ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. ती म्हण अगदी खरी आहे. अजून एक अशीच म्हण आहे ‘मातृदेवो भव:’ ती पण म्हण खरी आहे. आज बरोबर पंधरा वर्षे झाली माझ्या आईला जाऊन, २ मार्च २००९ . या पंधरा वर्षात अनेक वेळेला मी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात गेलो किंवा तुळजापूरला आई भवानीच्या मंदिरात गेलो किंवा वणी सप्तशृंगी मंदिरात गेलो किंवा एकवीरा देवीच्या मंदिरात गेलो की त्या मूर्तीमध्ये मला माझ्या आईचा भास होतं. आज शरीराने ती आमच्यात नाहीये पण तिने हे देवीचे रूप धारण केलंय असंच मला वाटतं. जी कोणी माऊली मला भाकरी खाऊ घालते तिच्या रूपात पण मला माझी आई दिसते.” (Tv Serial)

“आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक नाती जगत असतो आणि मी तर अनेक वर्ष कलाकार म्हणून पण जगतोय. अनेक भूमिका करण्याची मला संधी मिळाली आहे. अनेक नाती अनुभवता आली, जगता आली आहेत. त्या सगळ्या नात्यांमध्ये ‘आईमुला’चं नातं हे सर्वात श्रेष्ठ आहे, त्याला तोडच नाही. जगामध्ये त्याच्यापेक्षा, पवित्र त्याच्यापेक्षा, निर्मळ, त्याच्यापेक्षा घट्ट नातं असूच शकतं नाही असं माझं मत आहे. म्हणून मला सारखं वाटतं की ज्यांच्या ज्यांच्याजवळ त्यांची आई आहे ते फार नशीबवान माणसं आहेत. माझी आई तर प्रेमाचा, वात्सल्याचा न संपणारा झराच होती. तिने कधीही लहानमोठा, गरीबश्रीमंत असा भेदभाव केला नाही. ” (Marathi Film)

“अन्नपूर्णा आणि सुगरण असल्यामुळे प्रत्येकाला पोटभर अन्न खाऊ घालून ती आपलं प्रेम आणि माया व्यक्त करायची. आलेल्या कोणत्याही पाहुण्याला अतिथी देवो भव समजून, त्यांच्या नोकरांना, ड्रायव्हरला सुद्धा तेवढ्याच आदराने आणि आग्रहाने पोटभर खाऊ घालायची. आणि एकदा का तिने वाढलेल्या आग्रहाचे जेवण जेवून कोणी गेला असेल तर तिच्या हातच्या जेवणाची चव तो जन्मभर विसरायचा नाही. आजच्या दिवशी तिचे विचार , तिचं म्हणणं , तिचं जगणं, व्यक्त करावसं वाटलं. तिचं कायम आहेच म्हणणं होतं, फक्त निस्वार्थ प्रेम करा, काहीच अपेक्षा करू नका, आपण काय घेऊन आलोय? आणि आपण काय घेऊन जाणार? फक्त लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद!” अभिनेता मिलिंद गवळीने मराठीसह हिंदी चित्रपटात आणि मालिकेंत काम केलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT