Aai Kuthe Kay Karte Serial Family Instagram
मनोरंजन बातम्या

Star Pravah Serials: ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अनिरुद्धने सांगितलं खरं कारण…

Arun Gawali On Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ यापैकी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

Arun Gawali On Aai Kuthe Kay Karte Serial

कायमच टीआरपी चार्टमध्ये अग्रेसर असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेंची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असते. ‘आई कुठे काय करते’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिका नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल ठरल्या आहेत. मालिकेप्रमाणेच मालिकेतले कलाकारही सोशल मीडियावर चर्चेत राहतात. अशातच सध्या सोशल मीडियावर ‘आई कुठे काय करते’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ यापैकी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण खरंच ‘आई कुठे काय करते’ ही मालिका बंद होणार का? याचे उत्तर या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतंच त्यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’सोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मालिका बंद होणार आहे की नाही? यावर भाष्य केलं. मुलाखतीत मिलिंद गवळींनी सांगितलं की, “ ‘आई कुठे काय करते’ मालिका संपणार नाही. मी जर प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण करतोय, तर तुम्ही मला काढून टाकणार का?, नाही. ज्या गोष्टीची सुरुवात झाली आहे, ते कधी ना कधी संपणार आहे. जन्माला आलोय तर कधी ना कधी तरी मृत्यू होणारच आहे. अजून तरी मालिकेची कथा संपलेली नाही. जोपर्यंत कथा पूर्ण होत नाही, तोपर्यंत मालिका संपणार नाही. मुख्य म्हणजे चाहते मालिका बंद करुन देणार नाहीत.”

मुलाखतीत मिलिंद गवळी पुढे म्हणाले की, “ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल आहे. मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ज्यांना टीआरपी आहे, त्या मालिका लवकर बंद करणार नाहीत..” ‘आई कुठे काय करते’ ही मालिका बंद होणार का? या चर्चांवर खुद्द अभिनेत्याने भाष्य केल्यामुळे आता चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. २० नोव्हेंबरपासून इशा केसकर प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘लक्ष्मीच्या पाऊलावर’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या स्टार प्रवाहावर ‘सुख म्हणजे नक्की काय’ ही मालिका रात्री ९.३० वाजता टेलिकास्ट होत आहे. येत्या काही दिवसांत ही मालिका बंद होणार का? या प्रश्नाचं उत्तर येत्या काळामध्ये आपल्याला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसणं महत्वाचं आहे - उद्धव ठाकरे

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT