Radha Sagar On Conceiving After 10 Years Of Marriage Instagram
मनोरंजन बातम्या

Radha Sagar Interview: लग्नाच्या १० वर्षांनंतर अभिनेत्री राधा सागर होणार आई; प्लानिंगचं कारणंही सांगितलं...

Radha Sagar News: अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा, गर्भधारणा, पती आणि तिच्या परिवाराकडून मिळत असलेला पाठिंबा याविषयी तिने वक्तव्य केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Radha Sagar On Conceiving After 10 Years Of Marriage

‘आई कुठे काय करते’ फेम राधा सागरने काही दिवसांपूर्वी बेबी बंप फोटोशूट करत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. अभिनेत्रीचे मॅटर्निटी फोटोशूट आणि डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, अभिनेत्रीने लग्नाच्या १० वर्षांनंतर आई होण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच अभिनेत्रीने ई-टाईम्सला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा, गर्भधारणा, पती आणि तिच्या परिवाराकडून मिळत असलेला पाठिंबा याविषयी तिने वक्तव्य केले आहे.

दरम्यान, मुलाखतीत गरोदरपणाबद्दल राधा म्हणाली, “मी लवकरच ‘गुड न्यूज’ देणार आहे. माझे सध्या गरोदरपणाचे अखेरचे दिवस सुरू आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये मी एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. मला ज्या दिवशी कळाले मी प्रेग्नेंट आहे, त्या दिवसापासून मी माझ्या आरोग्यावर आणि आहारावर उत्तम पद्धतीने लक्ष देते. गरोदररपणाच्या काळामध्ये, चांगल्या दर्जाचा आहार, आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे, सोबतच निरोगी आणि आनंदी राहणे आवश्यक आहे. जर आईचे आरोग्य उत्तम असेल तर बाळाचेही आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे सर्व गोष्टींचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे.”

राधा आणि पती सागरचं १० वर्षांपूर्वी लग्न झालं होतं, त्यांनी इतका वर्षाचा गॅप घेत आई होण्याचा निर्णय का घेतला? या मुद्द्यावर देखील तिने भाष्य केले, ती म्हणते, “माझ्या आणि सागरच्या लग्नाला १० वर्षे झाली आहेत. माझं लग्न झाल्यानंतरच मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय झाले. माझ्याकडे आणि सागरकडे सुद्धा स्वतःसाठी आणि करिअरसाठी पुरेसा वेळ होता. आम्ही दोघंही एकमेकांच्या करिअरमध्ये सेट झालो आणि मगच बाळाचा विचार केला. मला वाटतं गरोदरपणात नवरा आणि घरच्यांचा पाठिंबा असायला हवा कारण गरोदर स्त्रीसाठी ती सर्वात महत्त्वाची गोष्ट असते.”

तर पुढे मुलाखतीत अभिनेत्री म्हणते, “बाळ होऊ द्यायचं की नाही हा वैयक्तिक निर्णय असतो. मी बाळाचा निर्णय घेतला आणि माझ्या करिअरमधून ब्रेक घेतला. आजकाल काही लोक सरोगसी आणि आयव्हीएफ गर्भधारणा या गोष्टींची निवड करतात. परंतु, मला सामान्य गर्भधारणा हवी होती आणि मी ती निवडली. माझ्या प्रसूतीनंतर मी माझ्या बाळाला वेळ देण्याचे ठरवले आहे. मी पती सागरने आम्ही दोघांनीही एकमेकांचे कामं देखील वाटून घेतली आहे. मला काम पुन्हा सुरू करण्याची घाई नाही, मी माझ्या बाळाला वेळ देण्याचे ठरवले आहे.” असे राधा सागरने मुलाखतीत सांगितले.

दरम्यान, अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, 'आई कुठे काय करते', 'सुंदरा मनामध्ये भरली' सोबतच चंद्रमुखी आणि भिरकीट चित्रपटातून तिने आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेसाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; यंदा केली नव्या टॅगलाईनची घोषणा

Santosh Deshmukh Case : मला आरोप मान्य नाही, कराड बोलला; न्यायाधीशांनी फटकारलं, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: केडीएमसी निवडणुकीत महायुती होणार; शिवसेना भाजप जागावाटपाबाबत बैठका सुरू

नमो भारत एक्स्प्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवले, आता अंगाशी येणार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूण-तरुणीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT