Milind Gawali Post Instagram
मनोरंजन बातम्या

Milind Gawali Post: ‘मुलांना आळशी शिक्षण पद्धतीतून बाहेर काढायचे असेल तर...’, लोहगड किल्ला सर करताना मिलिंद गवळींनी मांडला नवा विचार

Milind Gawali: मिलिंद गवळीने लोहगड किल्ला चढतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत एक विचार शेअर केला आहे.

Chetan Bodke

Milind Gawali Post

‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी कायमच आपल्या अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. नेहमीच चाहत्यांसोबत मिलिंद गवळी आपल्या खासगी आयुष्यातील अनेक किस्से पोस्टच्या माध्यामातून शेअर करत असतो. नुकतंच मिलिंद गवळीने एक पोस्ट शेअर केली आहे. या शेअर केलेल्या पोस्टमध्ये मिलिंद गवळीने लोहगड किल्ला चढतानाचा एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांसोबत एक विचार शेअर केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोस्टमध्ये मिलिंद गवळी म्हणतो, “ “लोहगड” परवा हा गड चढायचा योग आला. खूप छान वाटलं, आपल्याला गड चढता येतो याचं एक वेगळं समाधान असतं, उंच डोंगर चढणं काय साधी गोष्ट नसते, आपण जेव्हा गड चढतो तेव्हा आपल्याला धाप लागत असते, काही लोक थांबत थांबत चढता, तर काहींचा स्टॅमिना चांगला असतो, ते एका दमात तो गड चढायचा प्रयत्न करतात, दररोज व्यायाम म्हणून गड चढणारे लोक पण आहेत. एकदा का आपण गडावर पोहोचलो की एक वेगळं समाधान मिळतं, वेगळीच शांती मिळते.” (Actor)

“माझ्याबरोबर “Zen” आमचा कुत्रा होता, तो एका दमामध्ये वरती धावत सुटला, त्याचा स्टॅमिना बघून मला त्याचा हेवा वाटला. असं वाटलं की आपल्या मध्ये सुद्धा अशी ताकद असायला हवी. वरती पोहोचल्यावर डोक्यामध्ये असंख्य विचार येत होते. ते विचार असे होते की जर शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर तो वर्गामध्ये बसून न शिकवतात जर आपण गडावरच मुलांना घेऊन गेलो आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला तर तो त्यांच्या कायमस्वरूपी मनामध्ये घर करून बसेल आणि महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोचतील.”

“जसं रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतनची स्थापना केली, एक वेगळी शिक्षण पद्धती तयार केली तशीच आपण का नाही तयार करू शकत, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड. या सगळ्या गडांवर/ किल्ल्यांवर जर मुलांसाठी शाळा सुरू केल्या, आणि तिथे त्यांना इतिहास शिकवला, तर मला नाही वाटत की या जन्मात ती मुलं कधी आपला महान इतिहास विसरतील. आत्ताच्या आळशी इंटरनेट शिक्षण पद्धतीतून त्यांना बाहेर काढायचे असेल तर त्यांना गड चढायला लावणे आणि गडावर इतिहास शिकवणे हा एक छान पर्याय मला सुचतो आहे.” असं अभिनेता मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये म्हणाला आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT