Radhika Deshpande SAAM TV
मनोरंजन बातम्या

Radhika Deshpande : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीनं सांगितला १६ व्या वर्षी घडलेला भयंकर प्रसंग, छेड काढणाऱ्याला घडवली मोठी अद्दल

Radhika Deshpande Share Incident : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री राधिका देशपांडे हिने आपल्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे. जो वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

Shreya Maskar

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे (Radhika Deshpande) हिने आपल्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे. जो ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. अभिनेत्री राधिका देशपांडे हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. तिने अनेक मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. ती कोणत्याही भूमिकेत जीव ओतते.

राधिकाने दिलेल्या एका मीडिया मुलाखतीत आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. ती १६ वर्षांची ट्रेनमध्ये तिच्यासोबत एक घटना घडली होती. राधिका म्हणाली की, "मी १६ वर्षांची असताना माझी बहीण आणि भाऊ असे तिघे मिळून प्रवास करत होतो. मी ट्रेनच्या वरच्या बर्थवर झोपले होते. मी गाडीच्या वरच्या बर्थवर झोपले होते. तेव्हा एका माणसाने मला स्पर्श केला. असे अनेक वेळा झाले. शेवटी मी तिसऱ्यांदा हात पकडला आणि गाडीत आरडाओरडा सुरू केला. मी आरडाओरडा केल्यावर लोकांनी आम्हाला झोपा काही नाही झाले असे म्हटले. पण मला रात्री झोप आली नाही कारण तो मुलगा तिथेच बसला होता. आजूबाजूला अनेक लोक होते. तरी आम्ही घाबरलो होतो. "

पुढे राधिका म्हणाली की, "रात्री अडीच-तीन वाजता मी गाडीत आरडाओरडा सुरू केला होता. तिथे एक मुलगा आणि त्याचा मित्र होता. ज्याने मला स्पर्श केला. हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून गेला नाही. मी हाच विचार करत राहिले की, हे माझ्याबरोबरच का घडले आणि मला आईबाबांनी एकट का पाठवले. मी त्या मुलाला थोबाडीत मारली. एवढ होऊन सुद्धा आजूबाजूची लोक दीदी रहने दो... असे म्हणत होती. त्यानंतर मी टीसीला बोलावल आणि ती दोन्ही मुलं पुढच्या स्टेशनला खाली उतरवले."

राधिका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील घडामोडी आणि प्रोजक्टचे अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना देते. लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' यामध्ये तिने अरुंधतीच्या मैत्रीणीची भूमिका साकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST आरक्षणासाठी धनगर पुन्हा आक्रमक; आंदोलनानंतर धनगर समाजाचं आमरण उपोषण, VIDEO

Ladki Bahin Yojana : राज्यात दीड कोटी लाडक्या अपात्र? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

Credit Card : आरबीआयचा क्रेडिटधारकांना मोठा झटका; ही सुविधा झाली बंद, काय आहेत नवीन गाईडलाइन?

Solar Eclipse: सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करु नये?

Maharashtra Live News Update: पुण्यात पावसाचा कहर, बंगळूर-पुणे विमान मुंबईच्या दिशेने वळवले

SCROLL FOR NEXT