Madhurani Gokhale SAAM TV
मनोरंजन बातम्या

Madhurani Gokhale : 'आई कुठे काय करते'चा दुसरा भाग येणार? स्वतः मधुराणी प्रभुलकरनं दिली हिंट, म्हणाली...

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने मालिकेच्या दुसऱ्या पर्वाविषयी भाष्य केले आहे. ती नेमकं काय बोलली जाणून घ्या.

Shreya Maskar

अनेकांची आवडती मालिका 'आई कुठे काय करते'ने (Aai Kuthe Kay Karte) अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेने तब्बल पाच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेने अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळवून दिली. या मालिकेतून अनेक कलाकारांनी रसिक माय बाप बाप प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

'आई कुठे काय करते' या मालिकेत मुख्य आईची भूमिका मराठी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने (Madhurani Gokhale) साकारली आहे. यात तिच्या पात्राचे नाव अरुंधती होते. तर मालिकेत अरुंधतीचा नवरा म्हणजे अनिरुद्धची भूमिका मिलिंद गवळी यांनी केली. यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लागले. ही पात्रे त्यांना आपलीशी वाटू लागली.

'आई कुठे काय करते' मालिका संपल्यामुळे मालिकेतील कलाकार गेले अनेक दिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. आपला मालिकेचा प्रवास त्यांच्यासोबत शेअर करत आहेत. अशात आता मालिकेची मुख्य नायिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने चाहत्यांशी संवाद साधला आहे. तिने इन्स्टाग्राम लाइव्ह जाणून प्रेक्षकांशी गप्पा मारल्या.

मधुराणी प्रभुलकरला लाइव्हमध्ये एका चाहत्यांने प्रश्न केला की, 'आई कुठे काय करते' मालिकेचे दुसरे पर्व येणार आहे का? त्यावर मधुराणीने खूप खास उत्तर दिलं. ती म्हणाली की, "तुम्ही तुमचं हे मत स्टार प्रवाहच्या अकाउंटवर नक्की पाठवा. त्यांनी जर 'आई कुठे काय करते' चे दुसर पर्व करायचे ठरवले तर आम्हा सगळ्या कलाकारांना पुन्हा काम करायला खूप आवडेल. " तसेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने प्रेक्षकांच्या प्रेमासाठी त्यांचे भरभरून आभार मानले आहेत. तसेच ती नवीन मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेने 30 नोव्हेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशाच्या राजकारणात उलथापालथ! विरोधकांचे ७ खासदार सत्तेत जाणार, यादी आली समोर; तिघांचा भाजपात आजच प्रवेश

ठाकरे-पवारांचा पक्ष फोडला, तोच वॉशिंग मशिनचा खेळ पंजाबमध्ये; मुख्यमंत्री मान भाजपवर संतापले

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

SCROLL FOR NEXT