मनोरंजन बातम्या

Actress Radha Baby Bump Photo : पाहुणा घरी येणार गं! 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने डोहाळ जेवणाचे गोड फोटो केले शेअर

Radha Sagar Share Photo: राधाने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.

Pooja Dange

Actress Radha Sagar Share Baby Shower Photo : 'आई कुठे काय करते' फेम राधा सागर हीने काही दिवसांपूर्वी ती आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. राधा सागरने मॅटर्निटी फोटोशूट करत तिने ही गॉड बातमी शेअर केली होती. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. तर आता राधाने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री राधा सागर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत नुकतेच तिने तिच्या डोहाळ जेवणातील कार्यक्रमातील फोटो शेअर केले आहेत.

राधा सागरच्या डोहाळ जेवणाचे फोटो

राधा सागरने सोशल मीडियावर तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर केले आहे. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमानिमित्त तिने लाईट ग्रीन कलरची साडी नेसली आहे. तर त्यावर फुलांचे दागिने, नाकात नाथ घालून ती खूप सुंदर दिसत आहे. तर हातात धनुष्यबाण, फुलांची परडी आणि चंद्रासोबतही तिने फोटो काढले आहेत. तर नवऱ्यासोबतही तिने काही पोज दिल्या आहेत.

राधाने या फोटोंना सुंदर कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिले आहे की, आयुष्यातील सुंदर वळण म्हणजे 'आई' होणं. हे अनुभवण्याची हीच आहे खरी सुरवात. डोहाळ जेवणं', असं लिहित डोहाळ जेवणाचे फोटो राधाने शेअर केले आहे.

राधाचं डोहाळ जेवण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरं करण्यात आलं आहे. राधा आणि तिचा नवरा सागर दोघेही खूप आनंदी दिसत आहे. राधाच्या या पोंस्टवर तिचे चाहते कमेंट करत तिचे अभिनंदन करत आहेत. (Latest Entertainment News)

राधा 'आई कुठे काय करते' मालिकेतील अंकिताच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत काम केले. त्यानंतर तिने ब्रेक घेतला आणि आता राधा तिची प्रेगन्सी एन्जॉय करत आहे.

राधा सोशल मीडियीवर सक्रिय असते. तिने तिच्या बेबी बंपचे फोटो याआधीही शोअर केले आहेत या फोटोमध्येही ती खूपच सुंदर दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात ऊस दरासाठी असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Methi Thepla Recipe : नाश्त्यासाठी बनवा गुजरात स्पेशल मेथी थेपला, झटपट तयार होते रेसिपी

मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने मोठं केलं, सलग ५ वेळा अपयश, ६व्या प्रयत्नात IPS; अंशिका जैन यांचा प्रवास

Oldest Forts In India: भारतातील सगळ्यात जूने किल्ले कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT