Milind Gawali Shared On Siddharth Jadhav Appreciated Post Instagram
मनोरंजन बातम्या

Milind Gawali Post: “सिद्धार्थचा सेन्स ऑफ ह्यूमर अन् कॉमेडी टायमिंग…”; अभिनेता मिलिंद गवळीने सिद्धार्थ जाधवचं केलं कौतुक

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी यांनी अभिनेता आणि ‘होऊ दे धिंगाणा २’चा होस्ट सिद्धार्थ जाधवचं कौतुक केलं आहे.

Chetan Bodke

Milind Gawali Shared On Siddharth Jadhav Appreciated Post

स्टार प्रवाहवरील ‘होऊ दे धिंगाणा २’ कार्यक्रम दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या शोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते. नुकताच शोमध्ये ‘आई कुठे काय करते’ आणि ‘अबोली’च्या टीमने हजेरी लावली होती. यावेळी दोन्ही टीमने शोमध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. शोमध्ये हजेरी लावल्यानंतर अभिनेते मिलिंद गवळी यांनी अभिनेता आणि ‘होऊ दे धिंगाणा २’चा होस्ट सिद्धार्थ जाधवचं कौतुक केलं आहे.

मिलिंद गवळी आपल्या पोस्टमध्ये कौतुक करताना म्हणाले, “ ‘आता होऊ दे धिंगाणा २’ स्टार प्रवाह चा एक धमाल कार्यक्रम, ज्यामध्ये आपला सिद्धार्थ जाधव अँकरिंग करतो. सिद्धार्थ जाधव च्या या कार्यक्रमांमध्ये मी पाचव्यांदा येतो आहे. “आई कुठे काय करते” या मालिकेचा कलाकार म्हणून मला बोलवलं जातं, मालिकेचे एकूण सात कलाकार असतात.”

“एखाद्या नवीन येणाऱ्या सिनेमाचं प्रमोशन सुद्धा या कार्यक्रमात केलं जातं, एकदा रितेश देशमुख आणि जेनेलियाचा ‘वेड’ नावाच्या चित्रपटाचं प्रमोशन होतं. दुसऱ्यांदा ‘सनी’ नावाच्या चित्रपटाचे प्रमोशन होतं आणि आत्ता या वेळेला ‘झिम्मा २’हेमंत ढोमे यांच्याच चित्रपटाचे प्रमोशन होतं.”

“त्या त्या चित्रपटाचे कलाकार आणि काही तंत्रज्ञ आमच्याबरोबर या कार्यक्रमात भाग घेतात. यावेळेला सुहास जोशी, हेमंत ठोमे क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, रिंकू राजगुरू आणि संगीतकार अमित राज हे सगळे आमच्याबरोबर उपस्थित होते! आणि त्यांनी सुद्धा खूप धमाल केली.” (Marathi Film)

“आपल्या मराठी इंडस्ट्री मध्ये एक असा कलाकार आहे ज्याच्यामध्ये इतकी भरभरून एनर्जी आहे की त्याच्यासारखी एनर्जी कुठल्याही दुसऱ्या कलाकाराकडे नाहीये. त्याचबरोबर तू उत्तम कलाकार आणि अतिशय नम्र असा व्यक्ती पण आहे, तू म्हणजे आमचा लाडका सिद्धार्थ जाधव.”

“आता मी या कार्यक्रमांमध्ये पाचव्यांदा जातोय आणि पाचव्यांदा मी सिद्धार्थला बारा-चौदा तास सतत एनर्जेटीकली परफॉर्म करताना पाहिलाय, त्यात सेन्स ऑफ ह्यूमर, कॉमेडी टायमिंग याला सुद्धा तोड नाही. माझ्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक स्ट्रेस बस्टर असतो.” (Marathi Actors)

“१२ ते १४ तास फक्त हसत राहायचं आणि प्रसन्न राहायचं. वेड्यासारखी धमाल मस्ती बालिशपणा जो तुम्ही आयुष्यात कधीही केलेली नसतो, तो तिकडे जाऊन करायचा, हा नियम आहे ह्या कार्यक्रमाचा. आमच्याबरोबर तुम्ही पण हसा आणि प्रसन्न व्हा...” असं मिलिंद गवळी यांनी सिद्धुसाठी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT