Aai Kuthe kay Karte 6 July Episode Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe kay Karte Latest Update : आशुतोष-नितीनच्या मैत्रीत फूट ? अनिरुद्धची डाव यशस्वी

Aai Kuthe kay Karte 6 July Episode : वीणाने गेल्या काही भागात तिच्या आयुष्यात काय घडलं हे अरुंधती आणि अनिरुद्ध सांगितलं आहे.

Pooja Dange

Anirudha Find Veena's Phone Location : आई कुठे काय करते या मालिकेत सध्या एक रंजक वळण पाहायला मिळत आहे. अनिरुद्ध, वीणाचं अटेंशन मिळावं यासाठी प्रयत्न करत आहे. वीणाचा फोन हरवल्याने सर्वजण त्याचा शोध घेत आहेत. तिच्या फोनमध्ये खासगी फोटो आणि व्हिडिओ आहेत ज्यामुळे ती टेंशनमध्ये आहे. अनिरुद्धाला तिच्या फोनचा लोकेशन सापडलं असून त्याने हे आशुतोष, अरुंधती, नितीन यांना सांगितले आहे.

आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीची मालिका आहे. या मालिकेत वीणाच्याआधीच्या येण्याने ट्विस्ट आला आहे. प्रेक्षक तिच्या जीवनाविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. तर वीणाने गेल्या काही भागात तिच्या आयुष्यात काय घडलं हे अरुंधती आणि अनिरुद्ध सांगितलं आहे. (Latest Entertainment News)

कालच्या भागात काय घडलं ?

वीणाचा फोन हरविल्याने ती खूप अस्वस्थ असते. नितीन आणि अनिरुद्धला फोन हरविल्याचे सांगते. वीणा आणि अरुंधती शॉपिंगला गेले असताना एक बाई त्यांच्या जवळ येऊन तिला नवरा मारतो असे सांगते. त्याने वीणा पुरती घाबरून जाते. तसेच अरुंधतीला तिच्या भूतकाळाविषयी सर्व सांगते.

दुसरीकडे अनिरुद्धला वीणाचा मोबाईल त्याच्या कारमध्ये सापडतो. परंतु अनिरुद्ध मोबाईल तिला परत ने देता त्यावरून तिले फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास देतो. तसेच तिची सहानुभूती मिळविण्यासाठी तिला भेटायला येतो आणि २४ तासात फोनच लोकेशन तुला सांगतो असं तिला वाचन देतो.

आशुतोष या सगळ्याविषयी काहीच माहीत नसते. परंतु वीणाला भेटायला आलेल्या अनिरुद्ध आणि आशुतोष समोरासमोर येतात. तेव्हा अनिरुद्ध आशुतोषला सर्व वारंवार सांगतो. जेव्हा आशुतोष आणि सुलेखा यांना खार कळत तेव्हा त्या अरुंधतीवर रागावतात.

काय घडणार आजच्या भागात ?

केळकरांच्या घरी नितीन, आशुतोष, सुलेखा, वीणा सर्व एकत्र असताना अनिरुद्ध येतो. मित्राच्या मदतीने वीणाच्या फोनचं लोकेशन मिळालं असल्याचं तो सर्वांना सांगतो. वीणाला त्रास देणारा माणूस आशुतोषच्या ऑफिसमध्ये आहे, असं अनिरुद्ध सांगतो. त्यावर नितीन म्हणतो, जर अनिरुद्ध म्हणत असेल ते कंझर असेल तर आपण त्याच्या शोध घ्यायला हवा. त्यावर आशुतोष म्हणतो, जर माहिती बरोबर असेल तर त्या माणसाला मी स्वतःच्या हाताने पोलिसात देईन. असे म्हणत तो वीणाकडे एक कटाक्ष टाकतो.

अनिरुद्धच्या बोलण्यात तथ्य आहे का?

अनिरुद्धच्या बोलण्यात तथ्य आहे. कारण अनिरुद्धानेच आशुतोषच्या ऑफिसमधील नितीनच्या केबिनमध्ये जाऊन फोन ऑन केला आहे. अनिरुद्ध नितीनला अडकवायचे आहे. दुसरीकडे संजनाने अरुंधतीला अनिरुद्धांकडे असलेल्या दुसऱ्या फोनविषयी सांगितले आहे. याविषयी अनिरुद्ध काहीच माहित नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP vs Congress:'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका'; भाजप प्रदेशाध्यक्षांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार, कोणता बनणार नवा जिल्हा? सुनिल तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Saturday Horoscope: शनिवारी ग्रहांची मोठी कृपा! या राशींना मिळणार मेहनतीचे फळ, तर काहींना घ्यावी लागणार काळजी

SCROLL FOR NEXT