Salaar Teaser : प्रभासच्या 'सलार'ने नेटकरी निराश ; 'KGF 3'ची कॉपी आहे म्हणत केले ट्रोल

Salaar Disappointed Netizens : प्रभास आणि प्रशांत नीलच्या सलारचा टीजर आज प्रदर्शित झाला आहे.
Salaar Teaser Disappointed Netizens
Salaar Teaser Disappointed NetizensSaam Tv
Published On

Netizens Trend Disappointed For Prabhas Salaar : प्रभास आणि प्रशांत नीलच्या सलारचा टीजर आज प्रदर्शित झाला आहे. सलारचा टीजरने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. एक मिनिट 45 सेकंदाच्या टीजरमध्ये प्रभास हिंसक व्यक्ती दाखविला आहे आणि त्याचा चेहरा न दाखवता त्याची एक छोटीशी झलक टीजरमध्ये दिसत आहे. काही चाहत्यांनी टीझरला 'ब्लॉकबस्टर' म्हटले, तर काहींची निराशा झाली आहे. नेटिझन्स ट्विटरवर #Disappointed हा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

सलारच्या टीजरने प्रभासचे सगळेच चाहते प्रभावित झाले असे नाही, व्हिडिओमध्ये प्रभास दिसत नसल्यामुळे अनेकजण निराश झाले आहेत. प्रभासच लूक रिव्हील करण्यात आलेला नाही. पोस्टरचा बहुतांश भागात डार्क बॅकग्राइउंड दिसत आहे आणि प्रभासची प्रतिमा दिसत आहे.

Salaar Teaser Disappointed Netizens
Vidya Balan On Relationship : माझ्या नजरेत वासना होती... नवऱ्याला पहिल्यांदा पाहिल्यावर विद्या बालनच्या मनात आला भलताच विचार

अनेकांना सलार टीजर KGF 3 सारखा वाटत आहे. एका नेटकाऱ्याने टीजरवर त्याचे मत व्यक्त करता लिहिले आहे की, "निराश #SalaarTeaser. KGF कॉपी करत आहे. KGF ब्लॅक थीम कॉपी. KGF bgm कॉपी. KGF इंग्रजी डायलॉग कॉपी. केजीएफचा रिमेक.. ओन्ली यश (रॉकी भाई ) #Salaar हिट होऊ शकत नाही, दुसरा सर्वात मोठा फ्लॉप."

काही प्रेक्षकांना सलारचा टीजर आवडला आहे. त्यांनी प्रभासबद्दल प्रत्येक लहान तपशील टिपला आहे. अभिनेत्याचा स्क्रीन प्रेझेन्स आणि अॅक्शन सीक्वेन्सचे कौतुक केले जात आहे. हा चित्रपट KGF शी जोडला आहे आणि प्रशांत नीलच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग असल्याचे मत प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

सलारमधील हाय-ऑक्टेन अॅक्शनमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे अनेकांचे मत आहे. सलारच्या टीजरमध्ये टिनू आनंद एका औद्योगिक परिसर असलेल्या ठिकाणाजवळ प्रभासची कथा सांगताना दिसतो. (Latest Entertainment News)

श्रुती हसन या चित्रपटाची लीड आहे. पृथ्वीराज सुकुमारनही या चित्रपटात वर्धराज मन्नारची भूमिका साकारणार आहेत. यात जगपती बाबू, मधु गुरुस्वामी आणि ईश्‍वरी राव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या, विजय किरगंडूर यांनी होंबळे फिल्म्सच्या बॅनरखाली हा प्रोजेक्ट करत आहेत. हा चित्रपट 28 सप्टेंबरला तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com