Aadesh Bandekar son soham bandekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

Aadesh Bandekar son soham bandekar: आदेश बांदेकर आणि सुचिता बांदेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कपल आहेत. त्याचा मुलगाही मराठी चित्रपटसृष्टीत सक्रिय असून लवकरच तो विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Shruti Vilas Kadam

Aadesh Bandekar son soham bandekar: अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी रंगली आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा म्हणून ओळखले जाणारे आदेश बांदेकर नेहमीच आपल्या सांस्कृतिक, सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतात. त्यांचा मुलगा सोहमने देखील अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याने ‘ललित 205’ या मालिकेची निर्मिती केली तसेच ‘नवे लक्ष्य’ या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे की सोहमचा विवाह लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारीसोबत होणार आहे. पूजा बिरारी ही मराठी मालिकांमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत तिने मंजिरी ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. याशिवाय ‘साजणा’ आणि ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकांमधून तिने आपला ठसा उमटवला. विशेषतः ‘स्वाभिमान’ मालिकेतील तिच्या अभिनयामुळे तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली.

सोहम आणि पूजाच्या लग्नाच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी मनोरंजनविश्वातील दोन लोकप्रिय व्यक्तिमत्त्वे विवाहबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, या दोघांकडून किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे ही माहिती खरी की केवळ अफवा, याविषयी अजूनही संभ्रम आहे.

आता सोहम आणि पूजा यांच्याकडून याविषयी अधिकृत घोषणेची सर्वजण वाट पाहत आहेत. जर ही बातमी खरी ठरली तर बांदेकर कुटुंबात लवकरच लग्नाचा मंगल सोहळा रंगणार असून मराठी मनोरंजनविश्वातील हा विवाह समारंभ विशेष आकर्षण ठरेल, यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Aadesh Bandekar Son Wedding: महाराष्ट्राचे 'लाडके भावोजी' आदेश बांदेकरांची सून कोण आहे?

Shocking : प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा भीषण अपघातात मृत्यू; शरीराचे झाले दोन तुकडे

Kul Kayda: मालक झालेल्या कुळांच्या शेतजमिनीची विक्री करता येते का? काय आहे कुळ कायदा?

Maharashtra Live News Update: प्राजक्ता गायकवाड लग्नबंधणात अडकणार, लग्नपूर्वीच्या विधींना सुरूवात

SCROLL FOR NEXT