Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Janhvi Kapoor Trolled: मुंबईतील दहीहंडी कार्यक्रमात 'भारत माता की जय' म्हणण्याबद्दल झालेल्या टीकेवर जान्हवी कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर स्पष्ट केले आणि म्हणाली ती दररोज हा नारा म्हणेल.
Janhvi Kapoor
Janhvi KapoorSaam Tv
Published On

Janhvi Kapoor: १६ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात अभिनेत्री जान्हवी कपूर सहभागी झाली होती. जन्माष्टमीनिमित्त तिने या कार्यक्रमात हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हटले होते. याबद्दल तिच्यावर बरीच टीका झाली. आता अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया देत कार्यक्रमात 'भारत माता की जय' का म्हटले हे सांगितले आहे.

जान्हवी कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दहीहंडीची एक छोटी क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये ती हंडी फोडताना 'भारत माता की जय' असा जयघोष करताना दिसत आहे. या स्टोरीच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, 'फक्त संदर्भासाठी. जर मी काही बोलले नसते तरी ते काही लोकांना आवडल नसतं आणि मी अभिमानाने जयघोष केला तोही मीम मटेरियल म्हणून एडिट करण्यात आला आहे.'

Janhvi Kapoor
Actor Passes Away: पडद्यावरचा व्हिलन काळाच्या आड, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

दररोज 'भारत माता की जय' म्हणेल

जान्हवी कपूर पुढे लिहिते, 'आतापासून मी फक्त जन्माष्टमीलाच नाही तर दररोज भारत माता की जय म्हणेन!' या कार्यक्रमात जान्हवीने मराठीत भाषणही दिले, ज्यामध्ये तिने सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आणि २९ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा 'परम सुंदरी' हा चित्रपट पाहण्याची विनंती केली.

Janhvi Kapoor
Coolie VS War 2: रविवारी 'कुली'चा बोलबाला, 'वॉर २'ला पछाडले; चौथ्या दिवशी केलं इतक्या कोटींचं कलेक्शन

जान्हवी कपूरचा चित्रपट

'परम सुंदरी' चित्रपटात जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत. यात दिल्लीतील एका मुलाची आणि केरळातील एका मुलीची कहाणी दाखवण्यात येईल. त्यांची मैत्री आणि प्रेमाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या चित्रपटात राजीव खंडेलवाल आणि आकाश दहिया देखील मुख्य भूमिकेत आहेत. दिनेश विजान निर्मित हा चित्रपट २९ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com