Actor Passes Away: ब्रिटिश चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टेरेन्स स्टॅम्प यांचे निधन झाले आहे. सहा दशकांच्या कारकिर्दीत या अभिनेत्याने अनेक संस्मरणीय पात्रांना पडद्यावर जिवंत केले. ८७ वर्षीय या अभिनेत्याचे रविवारी निधन झाले, ज्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे.
अभिनय क्षेत्रात पदार्पण आणि सुरुवातीचे यश
लंडनमध्ये जन्मलेल्या टेरेन्स स्टॅम्प यांनी १९६२ मध्ये 'बिली बड' या चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करसाठी नामांकन देखील मिळाले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले.
जनरल जोडच्या व्यक्तिरेखेतून ओळख
जरी, स्टॅम्प यांनी अनेक गंभीर आणि भावनिक भूमिका साकारल्या असल्या तरी, त्यांना १९८० च्या 'सुपरमॅन II' मधील जनरल जोडच्या व्यक्तिरेखेतून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. टेरेन्स स्टॅम्प यांच्या सर्वाधिक कौतुकास्पद भूमिकांमध्ये १९९४ च्या 'द अॅडव्हेंचर ऑफ प्रिस्किला, क्वीन ऑफ द डेझर्ट' या होत्या.
स्टीवन सोडरबर्ग यांच्या १९९९ च्या 'द लाइमी' चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटात त्यांनी सूडाने भरलेल्या एका वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका गुन्हेगारी जॉनरच्या जगभरतील उत्तम चित्रपटांमध्ये गणली जाते. टेरेन्स स्टॅम्प यांनी केवळ चित्रपटांमध्येच काम केले नाही तर थिएटर आणि टेलिव्हिजनमध्येही सक्रिय होते. त्यांचा आवाज, पडद्यावरची उपस्थिती कौतुकास्पद होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.