Aadesh Bandekar Home Minister saam tv
मनोरंजन बातम्या

Aadesh Bandekar Home Minister : पैठणीचा खेळ घेऊन लाडके भाऊजी पुन्हा येणार घरी, आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' कधीपासून होणार सुरू?

Aadesh Bandekar - Home Minister Announcement : मराठी अभिनेते आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच शोचा प्रोमो समोर आला आहे.

Shreya Maskar

आदेश बांदेकरांचा 'होम मिनिस्टर' शो पुन्हा सुरू होणार

पैठणीचा खेळ पुन्हा रंगणार

'होम मिनिस्टर' कार्यक्रमाची घोषणा

महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम 'होम मिनिस्टर' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'दार उघड बये...दार उघड' ही हाक लवकरच वहिनींना ऐकू येणार आहे. पैठणीचा खेळ घेऊन आदेश भाऊजी वहिनींच्या घरी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'होम मिनिस्टर' च्या नवीन पर्वासाठी माहिला वर्ग खूपच उत्सुक पाहायला मिळत आहे.

१३ सप्टेंबर २००४ रोजी 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित झाला होता, तर कार्यक्रमाने तब्बल २० वर्षांनी म्हणजेच १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता पुन्हा एकदा भाऊजी येणार आहेत. झी मराठी वाहिनीने 'होम मिनिस्टर' चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात आदेश बांदेकर साडीच्या दुकानात जाऊन भरपूर पैठणी विकत घेताना दिसत आहेत.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "महाराष्ट्राचे लाडके भाऊजी पुन्हा घेऊन येतायत महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम! 'होम मिनिस्टर' लवकरच.. फक्त आपल्या झी मराठीवर!" या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. प्रेक्षक खास करून महिला वर्ग खूप आनंदी झाला आहे. कारण त्यांचे लाडके भाऊजी लवकरच घरी येणार आहे. या पोस्टवर आदेश बांदेकर यांच्या सुनेने देखील खास कमेंट केली आहे. तिने कमेंटमध्ये हार्ट इमोजी आणि फायर इमोजी टाकून लाडक्या सासरेबुवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

सुनेनंतर बांदेकरांच्या लेकाने देखील आपल्या वडीलांचे कौतुक केले आहे. सोहम बांदेकरने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करून त्यात लिहिलं की, "स्वामी समर्थ... बाबांना (आदेश बांदेकर) ऑनस्क्रीन बघून खूपच बरं वाटलं...फादर्स डेचं मलाच गिफ्ट मिळालं..." तसेच प्रोमो व्हिडीओवर बिग बॉस मराठी फेम आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकरने देखील कमेंट केली आहे. तिने लिहिलं की, "आता तर मला पैठणी हवीच..." सध्या महाराष्ट्रात 'होम मिनिस्टर' ची चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप कार्यक्रमाची रिलीज डेट आणि वेळ घोषित झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT