Chandrakor Paithani Design: वटपौर्णिमेसाठी नव्या नवरीला भेट द्या चंद्रकोर पैठणी, पाहा या ७ सुंदर ट्रेंडी डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

चंद्रकोर आकाराची नक्षी

या पैठणीच्या डिझाइनमध्ये चंद्रकोरीसारख्या अर्धवर्तुळाकार नक्षीचा वापर केला जातो. ही नक्षी साडीला पारंपरिक आणि आकर्षक स्वरूप देते.

Chandrakor Paithani Design | Pintrest

पदरावरील विणकाम

चंद्रकोर पैठणीचा पदर अत्यंत आकर्षक असतो. झरीच्या धाग्यांमधून विणलेल्या चंद्रकोर पॅटर्नमुळे साडीचा लूक अधिक उठावदार दिसतो.

Chandrakor Paithani Design | Pintrest

काठावर नाजूक डिझाइन

साडीच्या काठावर लहान-मोठ्या चंद्रकोर आकृत्या, फुलांची नक्षी किंवा पारंपरिक मोटिफ्स विणलेले असतात, यामुळे साडीला रॉयल टच मिळतो.

Chandrakor Paithani Design | Pintrest

झरीकामामुळे वाढते सौंदर्य

सोनेरी किंवा रुपेरी झरीचा वापर चंद्रकोर पॅटर्न अधिक उठावदार बनवतो. त्यामुळे साडीला श्रीमंत आणि देखणेपणा मिळतो.

Chandrakor Paithani Design | Pintrest

मोर, कमळ आणि वेलबुट्टीची जोड

अनेक चंद्रकोर पैठण्यांमध्ये चंद्रकोर डिझाइनसोबत मोर, कमळ, पानांची वेल किंवा पारंपरिक नक्षींचा समावेश केला जातो.

Chandrakor Paithani Design | Pintrest

पारंपरिक आणि आधुनिक डिझाइनचा संगम

आजकाल चंद्रकोर पॅटर्नमध्ये आधुनिक रंगसंगती आणि नवीन विणकाम तंत्रांचा वापर केला जातो, ज्यामुळे तरुणींमध्येही त्याची लोकप्रियता वाढली आहे.

Chandrakor Paithani Design | Pintrest

लग्न आणि खास प्रसंगांसाठी

चंद्रकोर पैठणी लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश आणि सण-समारंभांसाठी वापरला जातो. या सणांना पैठणी परिधान करणं प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं.

Chandrakor Paithani Design | Pintrest

Cycling Benefits: रोज १० मिनिटं सायकल चालवली तर वजन होईल झटक्यात कमी आणि मिळतील हे फायदे

Cycling benefits | Yandex
येथे क्लिक करा