Aabhas Ki Bhas New Marathi Song
Aabhas Ki Bhas New Marathi Song Saam TV
मनोरंजन बातम्या

Aabhas Ki Bhas New Marathi Song: 'आभास की भास' गेट टुगेदर चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित

Pooja Dange

Get Together Movie Song Released: पाहिलं प्रेम खास असतं. पण ते प्रत्येकाच्या आयुष्यात येत असं नाही आणि जर आलंच त ते मिळतच असं नाही. पण हे पहिले प्रेम कायम लक्षात राहतं. याच पहिल्या प्रेमाची आठवण करून देण्याचा प्रयत्न "गेट टुगेदर" या मराठी चित्रपटात करण्यात आला आहे.

या चित्रपटातील 'आभास की भास की तुझा हा श्वास गं' हे रोमँटिंग गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले आहे. जावेद अली,  प्रियांका बर्वे यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात हे गाणं गायलं आहे. हे गाणे श्रेया पासलकर आणि इमरान तांबोळीयांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

हे गाणे ऐकायला खूप गोड आहे. शाळेतील प्रेमावर हा चित्रपट आधारित आहे. त्यामुळे श्रेया आणि इमरान यांचे शाळेतील प्रेम यात खुलले आहे. येत्या १९ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत 'गेट टुगेदर' या चित्रपटाची निर्मिती  समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे.

अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. (Latest Entertainment News)

काही दिवसांपूर्वीच गेट टुगेदर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. तर आता पहिलं गाणं प्रदर्शित झाले आहे. शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न "गेट टुगेदर" या चित्रपटात करण्यात आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT