Raju Srivastava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raju Srivastava : 'यमराज आला तरी...' राजू श्रीवास्तवचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल

राजू श्रीवास्तवचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मृत्यूबद्दल बोलत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: कॉमेडियन राजू श्रीवास्तवची (Raju Srivastava) प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, यादरम्यान एक दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. राजू श्रीवास्तवचे निकटवर्तीय अन्नू अवस्थी याने या वृताला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी राजू श्रीवास्तवचे मेडिकल रिपोर्ट जारी करताना अन्नू अवस्थीने सांगितले की, राजूच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा होत आहे. राजू श्रीवास्तव लवकर बरा व्हावा म्हणून त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत. त्याच दरम्यान, राजू श्रीवास्तवचा एक व्हिडीओ देखील (Social Media) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मृत्यूबद्दल बोलत आहे

एकीकडे राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, राजू श्रीवास्तवचा २७ दिवसांपूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव मृत्यूबद्दल बोलत आहे. व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव त्याचे लोकप्रिय पात्र गजोधर भैय्याची भूमिका साकारताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये राजू म्हणतो, 'आयुष्यात प्रत्येकाने असे काम केले पाहिजे की, जेव्हा यमराज येईल तेव्हा तो तुम्हाला घेऊन जाताना म्हणेल, तुम्ही रेड्यावर बसा. आयुष्य असे जगावे की यमराज स्वतः पायी चालेल आणि रेड्यावर तुम्हाला बसवून म्हणेल 'तुम्ही थोर व्यक्ती आहात, तुम्ही असे चालत येणे चांगले नाही! मी पायी चालेन पण तुम्ही रेड्यावर बसा'.

हा व्हिडीओ २३ जुलै रोजी पोस्ट करण्यात आला होता. राजू श्रीवास्तवचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्स त्याची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून प्रार्थना करत आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेक यूजर्स कमेंट्स करत आहेत. कमेंटमध्ये यूजर्स राजू लवकर घरी परतावा यासाठी प्रार्थना करत आहे. माहितीनुसार, राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अलीकडेच, त्याचा भाऊ दीपू श्रीवास्तवने फेसबुक पोस्टद्वारे राजूच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे म्हटले होते. यासोबतच त्याने अशा अफवा पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT