Nagraj Manjule Saam Tv
मनोरंजन बातम्या

.... हा माझा अंत्यत जिव्हाळ्याचा विषय; नागराज मंजुळेची दुसरी बाजूही सांगणारी पोस्ट होतेय व्हायरल

नागराज मंजुळे हा चित्रपट दिग्दर्शक,अभिनेता आणि मराठी कवी आहे. लहानपणापासूनच त्याला चित्रपटामध्ये काम करण्याची आवड होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठीसह बॉलिवूडमध्येही दिग्दर्शनानं आपली छाप पाडणारा, तसंच रोजच्या जगण्यातील वास्तव पडद्यावर मांडणारा संवेदनशील दिग्दर्शक नागराज मंजुळे(Nagraj Manjule) घराघरांत पोहोचलाय. फॅन्ड्री, सैराट (sairat), नाळ, बाजी या नागराजच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. सैराटनं तर जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली. अलीकडेच नागराजनं झुंड या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यानं काम केलंय. दिग्दर्शनापलीकडचा नागराजही आता समोर आला आहे. नागराज मंजुळेची सोशल मीडियावरील पोस्ट आता व्हायरल होत आहे.

नागराज मंजुळे हा चित्रपट दिग्दर्शक,अभिनेता आणि मराठी कवी आहे. लहानपणापासूनच त्याला चित्रपटामध्ये काम करण्याची आवड होती. यासह पुस्तके वाचणे आणि कविता लेखन करणे हा देखील त्याचा छंद आहे. 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा त्याचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. ज्याला २०११ मध्ये भेरूतन दामाणी साहित्य पुरस्कार आणि २०१४ मध्ये नारायण सूर्वे काव्य प्रतिभा पुरस्कार मिळाला आहे.

नागराज मंजुळे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. नुकताच नागराज मंजुळेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लवकरच कविता संग्रह घेऊन येत आहोत, अशी पोस्ट केली आहे. जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट शेअर करत त्याने, "कविता हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. एखादी चांगली कविता वाचली की खूप समृद्ध झाल्यागत वाटतं. काही वर्षावूर्वी विक्रांतच्या तोंडून संग्रामच्या कविता ऐकल्या आणि भारावून गेलो. नंतर कळलं की संग्रामनं एकही कविता कधी कुठं प्रकाशित केली नाही. अलुफ, आत्ममग्न संग्रामनं त्याची कविता मित्रांच्या मैफिलीबाहेर कुठं जाऊच दिली नाही. संग्रामनं जणू आपल्याच गाळलेल्या जागा भरल्या आहेत. ह्या रिकाम्या पोकळीत आपल्यागतच आणखी एक जीव ह्या रिक्ततेचा अर्थ लावत बसला आहे हे जाणून जरासं दुकट वाटलं.."

"मला संग्रामच्या कविता प्रचंड आवडल्या. वाटलं ह्या कविताची अनुभूती आनंद सगळ्यांना घेता यावा म्हणूनच आटपाटच्या माध्यमातून रिकामटेकड्याचे आत्मवृत्त हा संग्राम बापू हजारे या मित्राचा पहिला संग्रह प्रकाशित करतोय.. आशा आहे तुम्हाला आवडेल भेटू सांगलीत..... २७ ऑगस्ट संध्याकाळी ४ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, सांगली. चांगभलं!" असंही नागराजनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलेला बोगस मतदान करताना पकडलं अन्...; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Election : महाविकास आघाडी फुटली; मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार

Kopargaon Nagarparishad: भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले, मतदान प्रक्रियेदरम्यान राडा | Video Viral

Bread Pakoda: तेलाचा एकही थेंब न वापरता बनवा हॉटेलच्या चवीसारखे ब्रेड पकोडे, वाचा झटपट रेसिपी

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

SCROLL FOR NEXT