Laal Singh Chaddha Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aamir Khan : आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'वर बंदीची मागणी; हायकोर्टात याचिका

लाल सिंग चड्ढा' चित्रपटाविरोधात सुरू असलेला गदारोळ थांबेना. आता या चित्रपटाविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शननिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाला बॉयकॉटला सामोरे जावे लागले होते. त्याचा बॉक्स ऑफिसच्या कमाईवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. हा विरोध अद्याप आहे. ऑस्कर विजेत्या 'फॉरेस्ट कॅम्प' या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटाचा विरोध कमी होताना दिसत नाही. देशाच्या विविध भागांतून या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. 'लाल सिंग चड्ढा'(Laal Singh Chaddha) चित्रपटाविरोधात सुरू असलेला गदारोळ थांबेना. आता या चित्रपटाविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

लाल सिंग चड्ढा या चित्रपटाविरोधात कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आमिर खानचा हा चित्रपट दाखविल्यास राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असा दावा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव आणि न्या. राजर्षी भारद्वाज यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटावर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. अलीकडेच, प्रसिद्ध वकील नाझिया इलाही खान यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी आणि चित्रपट दाखविल्यास शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते, असे म्हटले होते. पुढे त्यांनी चित्रपटगृहांमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, असेही सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

अफवांचा खेळ संपला, महाडिकवाडीतील भीतीचं भूत उतरलं, पोलीस-अंनिसने केला सत्याचा उलगडा

SCROLL FOR NEXT