Brahmastra  Saam Tv
मनोरंजन बातम्या

ब्रह्मास्त्रची नवी झेप; 'द कश्मीर फाइल्स'ला मागे टाकत ठरला या वर्षातला सर्वात मोठा चित्रपट

'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३५० कोटींची कमाई केली आहे

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt)'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने सलग दुसऱ्या रविवारी बॉक्स ऑफिसवर विक्रम केला आहे. ब्रह्मास्त्रने दुसऱ्या विकेंडमध्ये १७ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी 'ब्रह्मास्त्र'ने जास्त गल्ला केला. या सुपरहिट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३५० कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडत 'ब्रह्मास्त्र'ने विवेक अग्निहोत्रीच्या 'काश्मीर फाइल्स'लाही मागे टाकले आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा 'ब्रह्मास्त्र' ९ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. पहिल्या ३ दिवसांतच 'ब्रह्मास्त्र'ने फक्त हिंदी भाषेत ११२.२० कोटींचा व्यवसाय केला. तर, भारतात या चित्रपटाने एकूण १२४.४९ कोटींचा तर जगभरात सुमारे २२६.७५ कोटींचा व्यवसाय केला. रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट सुरुवातीपासूनच मोठी झेप घेत आला आहे.

रणबीर अलियाच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने बॉलिवूडसाठी आंनदाचे दिवस आणल्याचे बोलले जात आहे. केवळ १० दिवसांत चित्रपटाने २१३ कोटींचा गल्ला केला आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत फक्त एका बॉलिवूड चित्रपटाने २०० कोटींचा टप्पा पार करत विक्रम केला तो चित्रपट म्हणजे विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाइल्स'. मात्र बॉलिवूडमधील चित्रपटाच्या स्पर्धेत 'ब्रह्मास्त्र'ने 'द कश्मीर फाइल्स'ला देखील मागे टाकत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ३५० कोटींची कमाई केली आहे

मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडेच, 'केजीएफ' आणि 'आरआरआर' आणि 'पुष्पा' यांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली मात्र ते चित्रपट हिंदी रिमेक होते. 'ब्रह्मास्त्र'च्या या स्पर्धेत आता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया' चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांसाठी हे खूप मोठे यश आहे. चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांना जवळपास ९ वर्षे लागली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रतिक्षेत चाहते आहे.

Edited By- Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

Dhananjay Munde : बंजारा-वंजारा एकच? धनंजय मुंडेंच्या विधानानं वाद पेटला, वाचा स्पेशल रिपोर्ट

OBC Reservation : कुणबी बोगस प्रमाणपत्रांची सखोल पडताळणी होणार; मंत्री बावनकुळे यांच्यांकडून प्रशासनाला आदेश

SCROLL FOR NEXT