Famous Actress SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress : १-२ नाही तब्बल ५ राष्ट्रीय पुरस्कारांची मानकरी ठरली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, कधीकाळी ३० रुपयांसाठी विकायची कॉफी

72nd National Film Awards : ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना सन्मानित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज आपण अशा एका अभिनेत्री विषयी जाणून घेऊयात जिने आजवर तब्बल ५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत.

Shreya Maskar

७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा थाटामाटात पार

कार्तिक आर्यन , यामी गौतम यांचा सन्मान

बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला तब्बल ५ वेळा मिळाले आहेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

गुजरातच्या केवडिया येथील एकता नगरमध्ये काल (२२ सप्टेंबर २०२६) रोजी ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (72nd National Film Awards) सोहळा पार पडला.या प्रतिष्ठित सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. चित्रपट विश्वातील दमदार कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात.

कार्तिक आर्यन आणि मामूट्टी यांना संयुक्तपणे प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार राष्ट्रपतींकडून मिळाला. कार्तिकला 'चंदू चॅम्पियन' मधील कामगिरीसाठी तर मामूट्टीने 'ब्रमयुगम'साठी हा सन्मान देण्यात आला. यामी गौतमला 'आर्टिकल 370' साठी प्रमुख भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत, ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या दमदार अभिनयाने भारतीय चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करणाऱ्या एका अभिनेत्रीने चक्क पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आहे. ही कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) या आहेत. शबाना आझमी यांच्या नावावर भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्याचा सर्वकालीन विक्रम आहे.

'या' चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

  1. अंकुर - Ankur (१९७४) – त्यांचा पहिला चित्रपट आणि पहिला राष्ट्रीय पुरस्कार.

  2. अर्थ - Arth (१९८२) – महेश भट्ट यांच्या या चित्रपटाने वैवाहिक जीवनातील वेदना जिवंतपणे मांडल्या.

  3. खंडहर-Khandhar (१९८३) – मृणाल सेन यांच्या चित्रपटातील गंभीर भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

  4. पार - Paar (१९८४) – गौतम घोष यांच्या चित्रपटातील 'रामा'च्या भूमिकेसाठी त्यांना चौथा पुरस्कार मिळाला.

  5. गॉडमदर - Godmother (१९९८) – माफिया क्वीन रामबाईच्या भूमिकेने सर्वांना चकित केले आणि आपला पाचवा पुरस्कार जिंकला.

३० रुपयांना कॉफी विकली

शबाना आझमी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरी करिअरच्या सुरुवातीला एकेकाळी त्यांनी कॉफीही विकली आहे. मीडिया रिपोर्टनुसार,शबाना आझमी या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या माजी विद्यार्थिनी आहेत. संघर्षाच्या काळात अभिनेत्रीने एकदा तिच्या अभिनय संस्थेने आयोजित केलेल्या धर्मादाय मोहिमेत भाग घेतला, जिथे तिने पेट्रोल पंपावर कॉफी विकली आणि तिचा पहिला पगार म्हणून 30 रुपये मिळवले. शबाना आझमी यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री (१९८८/१९९८ मध्ये) आणि पद्मभूषण (२०१२ मध्ये) या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : महाविकास आघाड़ी भूमिकेमुळे शेकाप नाराज

Minister resignation news: मला मंत्रिमंडळातून मुक्त करा! केंद्रीय मंत्र्यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र, पदाचा आणि खासदारकीचाही दिला राजीनामा

'या' तारखेला जन्मलेला मुली असतात खडूस; भांडणात सासूबाईंची करतात बोलती बंद

राहुल गांधींच्या निवासस्थानी 'चाय पे चर्चा', इंडिया आघाडीच्या बैठकीत काय ठरलं? प्रमुख नेत्यांनी सांगितला पुढचा प्लान

Breast Cancer: पुरूषांनाही होतो ब्रेस्ट कॅन्सर, 'या' १० लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT