71st National Film Awards Shah Rukh Khan Vikrant Massey Rani Mukerji saam tv
मनोरंजन बातम्या

शाहरूख खानला ३ दशकांनंतर राष्ट्रीय पुरस्कार, विक्रांत मेस्सी सर्वोत्कृष्ट अभिनेता, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

71st National Film Awards : ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा अखेर झाली. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरूख खान आणि अभिनेता विक्रांत मेसी, तर राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

Nandkumar Joshi

  • ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

  • शाहरूख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार

  • तब्बल तीन दशकांनंतर शाहरूखला मिळाला सन्मान

  • विक्रांत मेसी सर्वोत्कृष्ट अभिनेता, राणी मुखर्जी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज, १ ऑगस्टला करण्यात आली. यावर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आणि त्यातील कलाकारांना सन्मानित करण्यात आलं. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरूख खान आणि विक्रांत मेसीला जाहीर झाला. तर सर्वोकृष्ट अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीला गौरवण्यात आलं. शाहरूख खानला हा राष्ट्रीय पुरस्कार तब्बल तीन दशकांनंतर पहिल्यांदाच मिळालाय.

जवान चित्रपटातील भूमिकेसाठी शाहरूख सन्मानित

शाहरूख खान याला २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या जवान चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. जवान या चित्रपटात शाहरूखसह नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, संजय दत्त, रिद्धी डोगरा या कलाकारांनी भूमिका केल्या होत्या.

12th Fail साठी विक्रांत मेसीला पुरस्कार

विक्रांत मेसीला २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 12th Fail या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं. हा चित्रपट आयपीएस मनोज कुमार शर्मा यांच्या आयुष्यावर बेतला आहे. विधु विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

राणी मुखर्जीचाही गौरव

मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. अनुरुप भट्टाचार्य आणि सागरिका चक्रवर्ती यांच्या खऱ्या आयुष्यावर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : अपघाताचा थरार! म्हशीला वाचवताना ५ वाहनांची जोरदार टक्कर, ४ जणांचा जागीच मृत्यू; रस्त्यावर मृतदेहाचा खच

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Vanjari Community: महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे ST प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

Nashik Crime: फिरण्याच्या बहाण्यानं मुंबईत आणलं; बाथरुममधील तिचे फोटो काढले,नंतर...

School Firing : शाळेत अंदाधुंद गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT