Beed Politics : 'मुंडे प्रचाराला आल्यास विपरित घडेल'; बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीत धुसफूस?

Beed Political news : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्टार प्रचारकपदी नियुक्ती केलेले धनंजय मुंडेंना आता पक्षातूनच घेरलंय.. मात्र सोळंकेंनी धनंजय मुंडेंबद्दल पक्षाला काय इशारा दिलाय... आणि मुंडेंचा पाय कसा खोलात चाललाय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Dhananjay Munde
Beed PoliticalSaam Tv
Published On

धनंजय मुंडेंच्या मागची वादाची मालिका काही थांबायला तयार नाही... त्यातच आता धनंजय मुंडे माजलगावला प्रचाराला आल्यास विपरित घडेल, असा इशाराच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी दिलाय...त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आलाय.

मात्र माजलगावमधून धनंजय मुंडेंना बोलवलंच नाही तर ते जाणार नाहीत... त्यामुळे पक्षातील अंतर्गत मुद्दा असा चव्हाट्यावर आणण्याची गरज नाही, अशी भूमिका अजित पवारांच्या राष्ट्रवादीने व्यक्त केलीय...तर बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा जिंकण्याचा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय.

Dhananjay Munde
Social Media last Post : प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; मृत्यूआधीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

खरंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं...त्यानंतर मुंडे विजनवासात गेले होते.. मात्र आता धनंजय मुंडेंची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आणि सर्वात आधी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी या पदावरून त्यांना लक्ष्य केलं होतं..

Dhananjay Munde
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुंडे वादाच्या भोवऱ्यात आहेत.. आधी करुणा मुंडेंच्या प्रकरणात कोर्टानं दिलेला विरोधातला निर्णय़...त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गेलेलं मंत्रिपद..एवढंच नव्हे तर कृषी घोटाळा आणि जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप... यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आहेत... त्यातच आधी मुंडेंच्या स्टार प्रचारकपदी झालेली नियुक्तीवरुन सोळंकेंनी पक्षाकडे केलेली तक्रार आणि आता त्यांनी माजलगावमध्ये सभा घेतल्यास विपरित परिणाम होईल, असा दिलेला इशारा... यामुळे मुंडेंच्या लोकप्रियतेचा उलटा प्रवास सुरु झालाय का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com