Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता; निवडणुकीच्या तोंडावर बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार?

Maharashtra Political news : एकनाथ शिंदेंना आणकी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाच्या नेत्याने अमित साटम यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Political news
Political news Saam tv
Published On
Summary

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून भेटीगाठी सुरु

शिंदे गटाचे नेत्याने अमित साटम यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

संजय गडदे, साम टीव्ही

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीला एकत्र लढलेले महायुतीतील घटक पक्ष यंदा पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महायुतीतच फोडाफोडी सुरु झाली आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे अल्ताफ (खान) पेवेकर यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईतील वर्सोव्यात शिंदे सेनेचे विभागप्रमुख अल्ताफ (खान)पेवेकर यांनी काल मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांची अंधेरी पश्चिम येथील कार्यालयात भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जवळपास एक तास दोघांत सविस्तर चर्चा झाल्याने पेवेकर भाजपात प्रवेश करणार का, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Political news
Mumbai Police Transfer : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, कारण काय?

पेवेकर हे मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक ५९ मधून उमेदवारीची इच्छा व्यक्त करत असल्याची माहिती मिळत आहे. भाजपने तिकीट दिल्यास ते पक्षप्रवेश करतील, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. २०१७ मध्ये हा प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. मात्र आता तो खुला झाल्याने भाजपाही दावा करू शकते, असे संकेत साटम यांनी यापूर्वी दिले होते.

Political news
Politics : पोलिसांची मोठी कारवाई, भाजपच्या महिला नेत्याला घेतलं ताब्यात; काय आहे प्रकरण?

मनसेचे सचिव म्हणून दीर्घकाळ काम केलेल्या पेवेकर यांनी गेली तीन वर्षे शिंदे सेनेत सक्रिय भूमिका बजावली होती. मात्र अंधेरी पश्चिमचे विभागप्रमुखपद अलीकडेच त्यांच्या हातून काढून घेण्यात आलं. मात्र ही भेट सदिच्छा भेट होती की राजकीय पक्षांतरासाठीची भेट हे मात्र लवकरच स्पष्ट होईल. मात्र या भेटीमुळे वर्सोव्यातील राजकीय चर्चांना मात्र वेग आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com