National Film Awards 2023 Saam Tv
मनोरंजन बातम्या

National Film Awards 2023: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते दिले जाणार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, कुठे आणि कधी पाहायला मिळणार?

National Film Awards Program: नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पुरस्कार सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Priya More

National Film Awards:

सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. आज दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Awards 2023) प्रदान केले जाणार आहेत. 24 ऑगस्ट 2023 रोजी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आज विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पुरस्कार सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भारताच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करणार आहेत. या सोहळ्यासाठी अनेक चित्रपट सेलिब्रिटी दिल्लीत पोहोचले आहेत. हा पुरस्कार सोहळा तुम्ही घर बसल्या देखील पाहू शकता. हा सोहळा कधी, कुठे पाहता येईल हे आज आपण जाणून घेणार आहोत...

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार स्वीकारण्यासाठी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन, एसएस राजामौली आणि एमएम कीरावानी दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, करण जोहर आणि अपूर्व मेहता हे देखील या पुरस्कार सोहळ्यासाठी आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत. हे सर्व कलाकार राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतील. ज्या कलाकारांना आज पुरस्कार मिळणार आहेत त्यांचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याला आज दुपारी 1.30 वाजता सुरुवात होणार आहे. डीडी नॅशनल आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलवर याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. दूरदर्शन नॅशनलच्या सोशल मीडिया हँडलने एक पोस्टर जारी करत ही माहिती दिली आहे.

दरम्यान, 2021 मध्ये CBFC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून प्रमाणपत्र मिळालेल्या भारतीय चित्रपटांसाठी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जात आहेत. भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली. हा पुरस्कार सोहळा भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून आयोजित केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT