Sunny Deol Upcoming Movie Instagram
मनोरंजन बातम्या

Sunny Deol Movie: 'गदर 2'च्या यशानंतर 65 वर्षीय सनी देओलचं करिअर सुसाट; आमिरनंतर आता अब्बास मस्तानसोबत करणार काम

Sunny Deol Team Up With Abbas Mastan: अब्बास मस्तान पहिल्यांदाच सनी देओलसोबत काम करणार आहेत.

Pooja Dange

Sunny Deol - Bobby Deol In KWK 8:

'गदर २' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेता सनी देओलची गाडी सुसाट निघाली आहे. सनी देओलच्या एका मागून एका प्रॉजेक्टची घोषणा होत आहे. ६५ वर्षीय सनी देओलच्या करियरला पून्हा वेग मिळाला आहे.

रामायण या आगामी चित्रपटाचे निर्मात्यांनी सनी देओलने हनुमानाच्या भूमिकेसाठी विचारणा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे सनी देओलशी बोलणे सुरू आहे. दुसरीकडे सनी देओल अब्बास मस्तान याचा चित्रपट साईन केला असल्याची पिंकविलाने दिली आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, सनी देओल राजकुमार संतोषी यांचा 'लाहोर १९४७' चे शूटिंग संपल्यानंतर अब्बास मस्तान यांच्यासोबत काम करायला सुरुवात करणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सनी देओल आणि अब्बास मस्तान यांच्या या चित्रपटाचे अद्याप नाव ठरलेले नाही. पण हा एक ऍक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीत हा चित्रपटाचे शूटिंगसाठी ऑन फ्लोर जाईल.

हा चित्रपट विशाल राना यांच्या Echelon Production या बॅनरखाली बनणार आहे. २०२४ च्या शेवटी या चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती पिंकविलाने दिली आहे.

अब्बास मस्तान यांनी बॉबी देओलसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ही जोडी पहिल्यांदाच सनी देओलसोबत काम करणार आहे. (Latest Entertainment News)

सनी देओल ४ महिन्यानंतर 'लाहोर १९४७'चे शूटिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट भारत-पाकिस्तान यांच्या विभाजनावर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान करणार आहे.

मिथुन चक्रवर्ती, सनी देओल, संजय दत्त, जॅकी श्रॉफ हे देखील एका चित्रपटामधेय एकत्र काम करणार आहेत. तब्बल ३० वर्षांनी हे कलाकार (Celebrity) एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटाला 'बाप' असे नाव देण्यात आले आहे.

तर सनी देओलच्या 'गदर' चित्रपटाचे निर्माते 'गदर २'च्या यशानंतर 'गदर ३' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT