36 Guni Jodi Serial Closed Saam Tv
मनोरंजन बातम्या

36 Guni Jodi Serial Closed: झी मराठीवरील मालिकांना उतरती कळा, दोन मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

Zee Marathi Serial: टीआरपीचा फटका ‘लोकमान्य’ या ऐतिहासिक मालिकेला आणि प्रेमावर आधारित असेलेली ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेलाही बसला आहे.

Chetan Bodke

36 Guni Jodi Serial Closed: झी मराठीवरील अनेक मालिका सध्या टीआरपीमुळे बंद कराव्या लागत आहे. सध्या झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. टीआरपीचा फटका ‘लोकमान्य’ या ऐतिहासिक मालिकेला आणि प्रेमावर आधारित असेलेली ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेलाही बसला आहे. लवकरच ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

उत्तम विषय, महत्वपूर्ण कथानक असलेली मालिका निर्मात्यांना बंद कराव्या लागत आहे. टीआरपीमुळे आणि वेळेआधीच चॅनेलला ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका बंद करावी लागत आहे. ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका २३ जानेवारीला सुरू झाली असून लवकरच ही मालिका प्रेक्षकांची रजा घेतेय. तिच्या ऐवजी आता प्रेक्षकांच्या भेटीला ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवीन मालिका दाखल होत आहे. (Serial)

निर्मात्यांनी प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या धाटणीचे विषय आणि दर्जेदार आशय आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांची वाढती पसंदी, आवडता विषय पाहता सध्या अनेक मालिका दिर्घकाळ चालत नाही. याचाच फटका आता झी मराठीवरील ऐतिहासिक मालिका ‘लोकमान्य’ आणि प्रेमावर आधारित असेलेली ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेला बसलाय. या दोन्हीही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यामुळे प्रेक्षक सध्या नाराज आहेत. (Entertainment News)

गेल्या काही दिवसांपूर्वी ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेचा जेव्हा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका बंद होणार अशी चर्चा होती. पण मालिकेच्या कथानकात निर्मात्यांनी बदल केल्यामुळे या मालिकेच्या टीआरपीमध्ये वाढ झाली आहे. (Marathi Film)

त्यामुळे आता ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेच्या वेळेत बदल होणार असून संध्याकाळी ६.३० वाजता मालिका प्रसारित होईल. दोन बहिणींची कथा सांगणारी ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. अशोक शिंदे, खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत हे कलाकार या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

SCROLL FOR NEXT