Akshay Kumar Real Name: अक्षय कुमारचं खरं नाव माहितीये का? नाव बदलण्यामागं ‘हे’ आहे कारण

Akshay Kumar Original Name: नेहमीच आपल्या अभिनयाकरिता चर्चेत राहिलेल्या अक्षयचं तुम्हाला खरं नाव माहितीये का?
Akshay Kumar's New Vegan Diet Plan
Akshay Kumar's New Vegan Diet PlanSaam TV
Published On

Why Akshay Kumar Changed His Name: बॉलिवूडमधील अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्यांनी आणि अभिनेत्रींनी आपल्या नावात बदल केला आहे. आजही सिनेसृष्टीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे सेलिब्रिटी होण्यापूर्वी त्यांनी आपले नावं बदलली आहेत.

९० च्या दशकापासून सुरू झालेला हा फॉर्म्युला आजही हिट ठरला. दिलीप कुमार, मधुबाला, जितेंद्र किंवा राजेश खन्ना यांनी नावात केलेला बदल पाहून आताच्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हा फॉर्म्युला वापरला. हाच फॉर्म्युला अभिनेता अक्षय कुमारनेही वापरला.

त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी त्याच्या नावामध्ये बदल केला. कदाचित तुम्हाला त्याचं खरं नाव माहित नसेल, चला तर जाणून घेऊया

Akshay Kumar's New Vegan Diet Plan
Bigg Boss OTT 2 : मनीषा रानीला टार्गेट केलं जातंय ? 'वीकेंड का वार'नंतर सलमान खानल ट्रोलर्सच्या निशाण्यावर

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. येत्या ११ ऑगस्टला अक्षयचा ‘ओएमजी २’चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीच आपल्या अभिनयाकरिता चर्चेत राहिलेल्या अक्षयचं तुम्हाला खरं नाव माहितीये का? अक्षय कुमारचं खरं नाव राजीव भाटिया आहे. पण त्याने आपल्या नावामध्ये बदल केला आहे. नेमका त्याने तो बदल का केला? याचं त्याने कारण स्पष्ट केलं आहे.

अक्षयचं खरं नाव राजीव हरी ओम भाटिया असं आहे. अभिनय क्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आलेल्या अक्षयने काही दिवस मार्शल आर्टच्या प्रशिक्षकाची नोकरी केली. त्यानंतर त्याने मॉडलिंग क्षेत्रातही आपले नशीब आजमावले. महेश भट दिग्दर्शित ‘आज’ चित्रपटात दिग्दर्शकाला एका दृश्यासाठी कराटे प्रशिक्षकाची गरज होती. मग त्या चित्रपटात अक्षयने कराटे प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. फ्लॉप ठरलेल्या चित्रपटामुळे अक्षयचं नशीबंच पालटलं. ‘आज’च्या शूटिंगमध्येच त्याने आपलं नाव बदलून अक्षय कुमार ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Akshay Kumar's New Vegan Diet Plan
Madhurani Gokhale On Politics : मधुराणी राजकरणात करणार प्रवेश? मुलाखतीदरम्यान अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली...

गेल्या काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय म्हणतो, “ ‘आज’मध्ये मी ४.५ सेकंदाचा अभिनय केला होता. चित्रपटात कुमार गौरवचा अभिनय मी पाहायचो. चित्रपटात माझ्या भूमिकेचे नाव ‘अक्षय कुमार’ होते. मला माझ्या भूमिकेचं नाव इतकं आवडलं की, एक दिवस मी कोर्टात जाऊन माझं नावच बदललं. मला फक्त जाऊन माझे नाव बदलायचे होते आणि मी वांद्रे पूर्व न्यायालयात जाऊन ते केले. माझ्याकडे पुरावा म्हणून सर्व प्रमाणपत्रं देखील आहेत.”

Akshay Kumar's New Vegan Diet Plan
Palak Tiwari Dating: वयाच्या १५ व्या वर्षी बॉयफ्रेंड, डेटवर जाण्यापासून रोखण्यासाठी पलकला श्वेता तिवारी द्यायची धमकी

‘आज’नंतर मला अनेक चित्रपट मिळू लागले. १९९१ मध्ये सौगंधमध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. १९९२ मध्ये ‘खिलाडी’ या सस्पेन्स फ्लिकने अक्षयला प्रसिद्धी मिळाली. ज्या चित्रपटाने अक्षयला प्रसिद्धी दिली, त्या चित्रपटातूनच त्याला ‘खिलाडी कुमार’ हे टोपण नाव मिळालं. अक्षय कुमारने लवकरच ‘दीदार’, ‘मोहरा’, ‘मैं खिलाडी तू अनारी’, ‘सुहाग’ आणि ‘खिलाडियों का खिलाडी’ यांसारख्या चित्रपटांतून ॲक्शन हिरोची भूमिका साकारली, तेव्हापासून अक्षय कुमार आजतागायत हिट चित्रपट देत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com