Pawan Kalyan instagram
मनोरंजन बातम्या

Pawan Kalyan : पवन कल्याण यांच्यावर गंभीर आरोप, 30 विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली, नेमकं घडलं काय?

Pawan Kalyan Convoy : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ताफ्यामुळे 30 विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली आहे. नेमकं घडलं काय, सविस्तर जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विशाखापट्टणममधील तब्बल 30 विद्यार्थी त्यांच्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा देता आली नाही. हे सर्व आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांच्या ताफ्यामुळे घडले आहे. नेमका प्रकार काय ,जाणून घेऊयात.

पवन कल्याण यांच्या ताफ्याने परीक्षा केंद्राकडे जाणारा मार्ग रोखून धरला होता. या घटनेमुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पेंडुर्थी एआय डिजिटल जेई ॲडव्हान्स प्रोग्रामचे विद्यार्थी संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) होती. ज्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) मध्ये प्रवेश निश्चित होतो. ट्रॅफिक ब्लॉकमुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले. 30 विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलच्या गेटमधून मागे वळवण्यात आले. त्यांना परीक्षेला बसू दिले गेले नाही.

एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितल्याप्रमाणे, पवन कल्याणच्या ताफ्यासाठी लागू केलेल्या वाहतूक निर्बंधांमुळे तिच्या मुलाला परीक्षा केंद्रावर पोहचायला उशीर झाला. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. कारण पवन कल्याण अराकूला जात होते. तर दुसऱ्या पालकाने उपमुख्यमंत्र्यांना परीक्षा देऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी असे आवाहन केले आहे.

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनने (AISF) परीक्षेदरम्यान वाहतूक व्यवस्थापनात अकार्यक्षमतेसाठी अधिकाऱ्यांवर जबाबदार ठरवले आहे. विरोधी वायएसआर काँग्रेसचे प्रवक्ते कार्तिक येल्लाप्रगडा यांनी राज्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून पवन कल्याण यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, "राज्याला एका चांगल्या मंत्र्याची गरज आहे. जो सिनेमॅटिक प्रतिमेच्यावर जाऊन खरी जबाबदारी देऊ शकेल."

विद्यार्थ्यी सकाळी 7 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अपेक्षित होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे 30 विद्यार्थी वेळेवर पोहोचले असते तर ते ट्रॅफिकमध्ये अडकण्याचा प्रश्नच नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना सकाळी 7 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहायचे होते, मात्र ते उशिरा पोहोचले. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा ताफा सकाळी 8.41 वाजता या परिसरातून गेला. जो विद्यार्थ्यांच्या येण्याच्या वेळेपेक्षा खूप उशिरा होता. यावरून पवन कल्याण यांच्या ताफ्याला विद्यार्थ्यांच्या विलंबाचे कारण नसल्याचे स्पष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT