Ko Tin Zaw Htwe Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ko Tin Zaw Htwe: प्रसिद्ध टिकटॉक स्टारची हत्या, धारदार शस्त्राने सपासप वार करत संपवलं; मृतदेह झाडाजवळ फेकला

Ko Tin Zaw Htwe Death: थायलंडच्या प्रसिद्ध टिकटॉक स्टारचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. एका झाडाखाली त्याचा मृतदेह सापडला असून त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आलेत. पोलिसांनी हत्या झाल्याचे सांगितले.

Priya More

Summary -

  • म्यानमारचा प्रसिद्ध टिकटॉक स्टार को टिन जॉ हत्वेचा मृत्यू

  • थायलंडच्या माई सोट जिल्ह्यात जंगलात झाडाखाली मृतदेह आढळला

  • शरीरावर धारदार शस्त्राने अनेक वार करत हत्या

  • या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि LGBTQ कंटेंट क्रिएटर को टिन जॉ हत्वेचा मृत्यू झाला. अय्यरवाडी माँ आणि किंवा इरावती माँ या नावाने तो प्रसिद्ध होता. ते २५ वर्षांचे होता आणि म्यानमारमधील एक लोकप्रिय टिकटॉक स्टार आणि प्रभावशाली व्यक्तीमत्व होता. २० जानेवारी २०२६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. त्यांच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत ते श्रद्धांजली वाहत आहेत.

टिकटॉक स्टार को टिन जॉ हत्वेच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या कुटुंबाला आणि मित्रांना मोठा धक्का बसला. त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून रुग्णलायत शवविच्छेदन सुरू आहे. त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, थायलंडच्या माई सोट जिल्ह्यातील एका जंगलाजवळ को टिन जॉ हत्वेचा मृतदेह आढळला होता. माई सोट पोलिसांना थोंग गावात एका झाडाखाली मृतदेह आढळून आला. टिकटॉक स्टारच्या शरीरावर अनेक वार केल्याच्या खुणा आढळल्या. मृतदेहाची स्थिती पाहून हत्येचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यानुसार तपास करत एका व्यक्तीला याप्रकरणी अटक केली.

को टिन डॉ हत्वे हा थायलंडच्या मे सोट शहरातील रहिवासी होता. त्याने फॅशन आणि डान्स कंटेंट तयार केले. सोशल मीडियावर त्याचा मोठा फॅन फॉलोइंग आहे. सध्या त्याचे ९,००,००० फॉलोअर्स आहेत. को टिन जॉ हत्वे मन मिळावू होता. त्याने तयार केलेला व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडायचे. त्याच्या प्रत्येक व्हिडीओला खूप सारे लाइक्स असायच्या.

माई सोटमधील स्थानिक वृत्तांत असा देखील दावा करण्यात आला आहे की, १९ जानेवारीच्या रात्री को टिन जॉ हत्वेला धमकीचा फोन आला होता. फोन आल्यानंतर तो एकटाच घराबाहेर पडला आणि परत आला नाही. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला. हाच फोन कुणाचा होता याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दावोसहून नंदुरबारसाठी 4 हजार कोटींची गुंतवणूक

आठ दिवसानंतर लॉजमध्ये आढळली बॉडी; गायब झालेल्या २७ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं?

Actress Harassment: आधी कंबरेला स्पर्श, मग अश्लील हावभाव केले...; कार्यक्रमातच प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत धक्कादायक कृत्य, काय घडलं?

Padma Awards 2026 Announcement: पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कुणाचा होणार सन्मान? कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार, वाचा

Shivaji Maharaj Indian Navy history: छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक का म्हटलं जातं?

SCROLL FOR NEXT