Deepika And Ranbir's Viral Pics From YJHD's Anniversary Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Yeh Jawaani Hai Deewani' Completes 10 Years: रणबीर कपूरसोबतचा तो इमोशनल VIDEO दीपिकाने केला शेअर, म्हणाली - ‘माझा आत्मा...’

Deepika Padukone And Ranbir Kapoor Films: ‘ये जवानी ये दिवानी’ चित्रपटाला १० वर्ष पुर्ण झाल्याने सोशल मीडियावर कलाकारांसह निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Deepika And Ranbir's Viral Pics From YJHD's Anniversary: दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र येत काम केले होते. ते चित्रपट म्हणजे, तमाशा आणि ये जवानी ये दिवानी मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. ‘ये जवानी ये दिवानी’ या चित्रपटाला आज प्रदर्शित होऊन १० वर्ष झाले आहेत. ‘ये जवानी ये दिवानी’ मध्ये दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन, रणबीर कपूर, आदित्य रॉय कपूर हे सेलिब्रिटी एकत्र झळकले होते. चित्रपटाला १० वर्ष पुर्ण झाल्याने सोशल मीडियावर कलाकारांसह निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी पोस्ट शेअर केली आहे.

‘ये जवानी ये दिवानी’ चित्रपटाला १० वर्ष पुर्ण झाल्यामुळे सोशल मीडियावर दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन, अयान मुखर्जी आणि करण जोहर यांनी २०१३ मधील चित्रपटाच्या आठवणी शेअर केल्या. YJHD 10 वर्षे पूर्ण करत असताना, चित्रपटाची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटो शेअर केला. काल रात्री भेटले असल्याची माहिती दिग्दर्शकांनी दिली आहे.

रणबीर दीपिकाच्या ‘ये जवानी ये दिवानी’ चित्रपटाची कथा, सीन्स आणि गाणी तरूणांना आजही आकर्षित करतात. या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. आता दीपिकाने रणबीर कपूरसोबतचे चित्रपटातील अनेक व्हिडिओ- फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्या पोस्टला तिने कॅप्शन दिले की, ‘माझ्या हृदयाचा तुकडा’ तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ‘माझा आत्मा...’ असे कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे. यावेळी दीपिकाने शूटिंग दरम्यानचे अनेक किस्से शेअर केले.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी ये दिवानी’ची आजही लोकप्रियता कायम आहे. अयान मुखर्जीने या चित्रपटातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यावेळी दिग्दर्शकांनी हा चित्रपट माझ्या मुलासारखा असून तो माझ्या हृदयाचा तुकडा आणि आत्मा असल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. (Entertainment News)

‘ये जवानी ये दिवानी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले होते. या चित्रपटात दीपिका रणबीर व्यतिरिक्त आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिन देखील मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील 'बलम पिचकारी', 'बदतमीज दिल' आणि 'कबीरा' सारखी गाणी हिट झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT