Private schools will not be able to increase admission fees this year 
शिक्षण

खासगी शाळांना यंदा वाढवता येणार नाही प्रवेश शुल्क; शिक्षणाधिकारी काढणार नोटीस 

यूएनआय

अमरावती:  कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर एक वर्षापासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या काळात नागरिकांवर कोसळलेले आर्थिक संकट पाहता खासगी शाळांनी प्रवेश शुल्कात वाढ करू नये, या संदर्भातील नोटीस प्राथमिक व माध्यमिक दोन्ही विभागाच्या वतीने काढण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती जि.प प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड खान यांनी दिली आहे. Private schools will not be able to increase admission fees this year

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे Lockdown नागरिकांच्या हाताला काम नव्हते. अशाही परिस्थितीत काही खासगी शाळा Private Schools विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क वसूल करत आहेत. त्यामुळे कोरोना काळात पैशाची सोय करणे कठीण झालेल्या नागरिकांनी आपल्या पाल्याचे शालेय शुल्क कसे भरावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे एका संघटनेने मनमानी करणाऱ्या खाजगी शाळांविषयी तक्रार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला केली आहे. 

दरम्यान खासगी शाळांनी कोरोना काळातील शाळेचे प्रवेश शुल्क माफ करण्याची मागणी विविध संघटना, पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.

हे देखील पहा- 

प्रवेश शुल्का संदर्भात खासगी शाळांना सूचना

कोरोनात शाळा बंद असल्याने खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी ज्या सुविधांचा लाभ शाळेतर्फे घेतला नाही. त्याचे शुल्क आकारू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या शाळेतील शुल्कसंदर्भात एक तक्रार आली होती. त्यामुळे या वर्षात प्रवेश शुल्क वाढवू नयेत, तशी नोटीस शाळांसाठी काढणार असल्याची माहिती जि.प प्रा.शिक्षणाधिकारी खान यांनी दिली. 

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेस पक्ष करणार मंथन

Mantralaya Ceiling Collapsed: मंत्री कॅबिनेट बैठकीत बिझी असतानाच मंत्रालयात छत कोसळलं, नेमकं काय घडलं, पाहा | VIDEO

Sevai Pulao Recipe : रोजचा डाळ-भात खाऊन कंटाळलात? जेवणाला खास बनवा चमचमीत शेवयाचा पुलाव

Raksha Bandhan Saree Gift: राखीपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या बहिणीला भेट द्या ही सुंदर साडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीने गोर-गरिबांचा 'आनंद' हिरावला; गणेशोत्सवात नाही मिळणार 'आनंदाचा शिधा'

SCROLL FOR NEXT