Corona Fear
Corona Fear 
शिक्षण

अंत्यविधीला जमलेल्या 300 पैकी 105 आढळले कोरोना पाॅझिटिव्ह: उरलेले फरार

साम टीव्ही ब्युरो

बुलढाणा : नांदुरा Nandura  तालुक्यातील पोटा Pota गावात कोरोनाबाधित मयताच्या अंत्यसंस्कारात तब्बल 300 लोक सामील झाले होते. त्यामध्ये सामिल झालेल्या 150 गावकरयांपैकी 105 जणांना कोरोनाची Corona लागन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. Over Hundred Found Corona Positive who Attended Funeral in Buldana

जेमतेम 700 लोकसंख्या असलेल्या पोटा या गावात कोरोनाबाधित Corona असलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यु Death काही दिवसांपूर्वी झाला होता. त्याच्या अंत्ययात्रेत गावातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. 

गावातील कोरोना उद्रेक आरोग्य प्रशासनाकडून आणि तालुका वैद्यकिय अधिकारी कडून गावातील नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने झाला आहे. असे कारण गावातील इतर नागरिकांनी दिले आहे. आता हे संपूर्ण गाव प्रतिबंधित Containment गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे.

तर या संपूर्ण गावातील नागरिकांची कोरोना तापासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती तेथील तहसिलदार राहुल तायड़े यांनी दिली.तसेच गावात आरोग्य तपासणीसाठी कॅम्प Camp सुरु आहे. असे असूनसुद्धा अंत्यविधि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पैकी 100 ते 150 लोक गावातूनच फरार झाले आहेत! Over Hundred Found Corona Positive who Attended Funeral in Buldana

त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्वरित आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन प्रशासना मार्फत केले गेले आहे. सध्या गावाच्या बाहेर प्रवेशबंदीचा No Entry फलक लावलेला आहे. अति प्रमाणात कोरोना रुग्ण असल्यामुळे कोणालाही गावात प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे.  

Edited By - Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT